Supriya Sule arrives at Varsha bungalow, meets Chief Minister ; सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
Mumbai : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरू असतानाच महाराष्ट्रातही एक अनपेक्षित राजकीय घडामोड झाली. बिहारमध्ये भाजप आणि जदयू आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे कल येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचल्या. बिहारमधील एनडीएच्या विजयाच्या वातावरणात महाराष्ट्रातील ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
या भेटीमुळे विविध राजकीय तर्कांना उधाण आले होते. मात्र काही वेळातच भेटीमागील खरा मुद्दा समोर आला. ही भेट राजकीय नव्हती तर वैयक्तिक स्वरूपाची होती. सुप्रिया सुळे या युगेंद्र पवार यांच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका देण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेल्या असल्याचे समजते. त्यामुळे निर्माण झालेला राजकीय गदारोळ शांत झाला असला तरी, बिहार निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर झालेल्यामुळे या भेटीने राज्यात चर्चांना उधाण आणले.
Sharad Pawar : आठवड्याभरात शरद पवारांना दोन मोठे राजकीय धक्के
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील नवले पूल दुर्घटनेनंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे. नवले ब्रीज परिसरात पुन्हा झालेल्या अपघातात जीवितहानी झाल्याने त्यांनी नऱ्हे ते रावेत या मंजूर मार्गाचे काम तातडीने सुरू करण्यासंबंधी ट्वीट करून आग्रह धरला. शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे सुरक्षा ऑडिट आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Bihar election result : ‘डेटा’ घसरला, जन सुराजचा ‘जन’ कुठे हरवला!
बिहारमध्ये सुरुवातीच्या कलांनुसार एनडीए आघाडी स्पष्टपणे पुढे आहे. निवडणूक आयोगाच्या अपडेटनुसार भाजप 83, जेडीयू 79, आरजेडी 32, एलजेपीआर 22 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस आणि सीएमपीआयएमएल सहा-सहा जागांवर आघाडीवर आहेत. लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव हे अनुक्रमे आपल्या मतदारसंघांत पिछाडीवर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन होण्याची चिन्हे ठळक झाली असून याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.
_______








