As many as 46 leaders enter the grand alliance, leaks continue : तब्बल 46 नेत्यांची महायुतीमध्ये एन्ट्री, गळती सुरूच
Mumbai : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये राजकीय धक्के थांबण्याचे नाव घेत नाहीत. मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर सलग पराभवानंतर नाराज झालेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांचा महायुतीमध्ये लोंढा सुरूच आहे. आता या गळतीचा नेमका आकडा समोर आला असून त्यानुसार मविआच्या तब्बल 46 नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने आश्चर्यकारक असा विजय मिळवला होता. महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. मात्र त्याच लाटेचा फायदा विधानसभा निवडणुकीत मिळवण्यात मविआ अपयशी ठरली. मोठ्या उलटफेरीत महायुती म्हणजे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी जोरदार पुनरागमन केले आणि स्पष्ट बहुमत मिळवत 232 जागांवर विजय मिळवला. मविआला केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले.
Pune land scam : “आता माघार नाही”…घोटाळा हायकोर्टात नेण्याचा निर्धार !
या पराभवानंतर महाविकास आघाडीत नाराजी, अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वावरील प्रश्न अधिकच तीव्र होत गेले. त्याचदरम्यान महायुतीच्या दारात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढतच गेली.
माध्यमातील एका वृत्तानुसार, महाविकास आघाडीच्या वतीनं विधानसभा निवडणूक लढवलेल्या आणि पराभूत झालेल्या एकूण 46 उमेदवारांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. यात भाजपमध्ये सर्वाधिक 26 नेत्यांची एन्ट्री झाली, तरराष्ट्रवादी अजित पवार गटात 13 जणांचा प्रवेश झाला आणि 7 जणांची शिवसेना शिंदे गटात जाणे पसंत केले. यात 3 अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे.
विधानसभा निकालानुसार भाजप 132 जागांवर अव्वल असून शिवसेना शिंदे गट 57 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर जिंकले, तर मविआमध्ये शिवसेना ठाकरे गट 20 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 16 जागांवर यश मिळू शकले.
Local body election : निवडणूक कामावर नाही… निधीवर लढवली जातेय!
या निकालानंतर सुरू झालेली गळती थांबण्याचे चित्र अद्याप थांबलेले नाही. राजकीय विश्लेषकांचा अंदाज असा की शक्तीस्थाने टिकवण्यासाठी होत असलेल्या सततच्या पक्षांतरामुळे मविआची संघटनात्मक रचना हादरली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पुढील लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी महायुती सक्रियपणे नवीन चेहरे सामावून घेत आहे.
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा अस्थिर होत असताना, महाविकास आघाडी या गळतीला थांबवण्यासाठी काय पावले उचलते, आणि महायुतीमध्ये आलेल्या नेतावर्गाचा नवा प्रभाव निवडणुकांत किती प्रभावी ठरतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.








