Maharashtra politics : घोडामैदान जवळच, वल्गना करण्याचा उपयोग नाही

Shinde – Fadnavis group criticizes Thackeray alliance : ठाकरे युतीवरून शिंदे – फडणवीस गटाकडून टीका

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेला संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे उधाण आलं आहे. महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढतील आणि विजय मिळवतील, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकीय चर्चा सुरू झाला असून, शिंदे गट आणि भाजपने यावर थेट प्रतिक्रिया देत टीकेची झोड उठवली.

राऊत यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कल्याणसारख्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र लढतील आणि नक्कीच यशस्वी ठरतील, असा दावा केला. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी टीका करत म्हटलं की, घोडामैदान समोर आहे, उगाच वल्गना करण्याचा काही उपयोग नाही. निवडणूक लढा आणि निकाल लागल्यावर चित्र स्पष्ट होईल. त्यांनी पुढे म्हटलं की, महाराष्ट्राच्या विकासाचा विश्वास लोकांचा महायुतीवरच आहे. कोण कितीही घोषणाबाजी केली तरी जनतेचं मन महायुतीसोबतच आहे.

Adivasi Pardhi Development Council : क्रांतिवीर समशेरसिंह पारधी पॅकेजची घोषणा

महाजन यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टोलेबाजी करताना असंही म्हटलं की, “मुंबई, पुणे, नाशिकसारख्या एखाद्या ठिकाणी तरी ते निवडून येऊन दाखवावं. निवडणुकीच्या वेळीच मराठी – मराठीचा नारा लावून काही साध्य होणार नाही. विधानसभेत आम्ही विक्रमी मतांनी निवडून आलो, त्यामुळे मराठी मतं फक्त त्यांचीच आहेत असं नाही.

दरम्यान, राज ठाकरेंना महायुतीत सामील करण्याच्या चर्चेवर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले की, या विषयात माझी भूमिका नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीस या संपूर्ण चर्चेकडे पाहत आहेत. फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांना यावर काही सांगायचं आहे. अशा शब्दांत त्यांनी विषय टोलवला.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनीही संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी महायुतीला काही फरक पडणार नाही. सगळीकडे महायुतीचेच नगरसेवक निवडून येतील आणि महापौरपदही महायुतीकडे जाईल. शिंदेंना या युतीचा काहीही फटका बसणार नाही, असं ठणकावून सरनाईक म्हणाले.

Vijay Wadettiwar : पोलिसांमध्ये काम न करता ‘सिंघम’ का संचारतो ?

राऊतांच्या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा रंगली असली तरी भाजप आणि शिंदे गटाने ती फक्त ‘राजकीय हंडी’ असल्याचं सांगून फोडून काढली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका ठाकरे बंधू एकत्र येऊन लढणार की नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.