Maharashtra State Budget 2026 : शेतकऱ्यांच्या दोन लाखापर्यंत कर्ज माफ; मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची घोषणा

devendra-fadnavis-announces-loan-waiver-to-farmers : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत लाभ

Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. यासोबतच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजारापर्यंत लाभ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यात कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. कर्जमाफीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये रस्ता रोको आंदोलन केले होते. तत्पूर्वी महायुती सरकारने निवडणुकीच्या घोषणापत्रात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणापत्रातील सर्व आश्वासने पूर्ण केली जाईल असा शब्द दिला होता. मात्र त्यास वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कर्जमाफीची घोषणा केली जात नव्हती. विरोधकांनी यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

Buldhana Shivsena : बुलढाणा उद्धवसेनेत मोठी खळबळ; जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांचा राजीनामा

बच्चू कडू यांनी आक्रमक आंदोलने केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक समिती स्थापन केली होती. त्यात कडू यांचाही समावेश केला होता. पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळावी यासाठी या समितीने काही सूचना केल्या होत्या. गेल्या महिनाभरापासून राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक शेतकऱ्यांकडून कर्जाचे दस्तावेज जमा करण्याचे आवाहन केले होते.

Buldhana Congress : काँग्रेसचा ‘कार्यकर्ता प्रशिक्षण’ प्रयोग; गळतीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातही शिबिराचे वेध

त्यावेळी सध्याच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली जाईल असा अंदाज वर्तविला जात होता. कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापुढे शेतकरी कायमस्वरूपी कर्जमुक्त व्हावा यासाठी अनेक योजना जाहीर अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे राज्यात दोन वेळा नैसर्गिक संकट उद्भवले होते. त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा वाढल्या होत्या.