limit for personal works has been increased up to seven lakh rupees : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
Buldhana केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत विहिरी, शेततळे, जमीन विकास, फलोत्पादन व वृक्षलागवड अशा वैयक्तिक कामांसाठीची आर्थिक मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. यापूर्वी निश्चित केलेली दोन लाखांची मर्यादा आता थेट सात लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कामांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
मनरेगा योजनेअंतर्गत विहिरी, शेततळे, जमीन विकास, फलोत्पादन आणि वृक्षलागवड यांसारख्या वैयक्तिक कामांसाठी केंद्राने दोन लाखांची मर्यादा निश्चित केली होती. मात्र राज्य सरकारकडून विहिरींसाठी पाच लाखांपर्यंत अनुदान दिले जात असल्याने केंद्रीय मर्यादा आड येत होती आणि अनेक कामे तांत्रिक कारणांमुळे रखडली होती.
Tension at border : मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारल्याने तणाव!
नवीन मर्यादा लागू झाल्याने लाभार्थ्यांच्या वैयक्तिक कामांना गती मिळणार आहे. विहिरींसाठी पाच लाख, तर फलोत्पादन व वृक्षलागवडीसाठी सात लाखांपर्यंत मंजुरी मिळणार आहे. देशभर लागू झालेल्या या निर्णयामुळे शेती विकासाला मोठी चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण विकास मंत्रालयाकडून मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून पाठविण्यात आला होता. रोहयो (ग्रामीण विकास) राज्य आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी राज्य सचिवांना सात लाखांपर्यंत मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर राज्य सरकारने केंद्राकडे औपचारिक शिफारस करून प्रक्रिया गतिमान केली.
मनरेगांतर्गत शासनाच्या एकूण २६२ कामांची अंमलबजावणी केली जाऊ शकते. त्यापैकी ६७ कामे वैयक्तिक लाभाची, ११ कामे बचत गटांसाठी, तर उर्वरित कामे सार्वजनिक हिताच्या स्वरूपातील आहेत.
Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींच्या मदतीला अंगणवाडी ‘ताई’!
पंचायत समिती अंतर्गत —
शोषखड्डे, शेततळे, विहीर पुनर्भरण, जैविक खत निर्मिती, गांडूळ खत निर्मिती.
लघुपाट विभाग अंतर्गत —
पाझर तलाव, वन तलाव, गाव तलाव.
कृती विभाग अंतर्गत —
सीटीसी, डीसीसीटी, कंपार्टमेंट बंडिंग, कंटूर बंडिंग, लहान व मोठे माती बंधारे इत्यादी कामे केली जातात.








