Breaking

Mahayuti Government : गरिबाची लेक सायकलने शाळेत जाणार!

 

Bicycle subsidy approved for three thousand school girls : तीन हजार विद्यार्थिनींसाठी सायकल अनुदान मंजूर

Bhandara मानव विकास योजनेअंतर्गत गरीब विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला हा निधी प्राप्त झाला आहे. लवकरच तो शाळांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे आता गरिबाची लेकही सायकलने शाळेत जाणार आहे.

इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना प्रत्येकी ५,००० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी आणि लाखांदूर या पाच तालुक्यांतील ३,००० विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होणार आहे. ही योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी असून, त्यांना शाळेत जाण्यास सोयीचे व्हावे, हा मुख्य उद्देश आहे.

Mahayuti Government : अकोला ७.३८ तर अमरावतीत ८.०३ टक्के रेडीरेकनर दरवाढ!

शासनाने निधी जाहीर केला असला, तरी अजूनही तो शाळांच्या खात्यावर वळता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे निधी मिळण्यास उशीर होत आहे. अनेक मुलींना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शैक्षणिक सत्र २६ जूनपासून सुरू झाले असले, तरी सायकली लवकर उपलब्ध झाल्या नाहीत, याबद्दल पालकांमध्ये नाराजी आहे.

Mahayuti Government : नेरी ठरणार सर्वात मोठे ‘सौरग्राम’!

अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी वेगळा निधी मंजूर करण्यात आला आहे, परंतु तो अद्याप कोषागारातून मंजूर झालेला नाही. लवकरच तोही शाळांना वितरित केला जाणार आहे. शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांनी हा निधी लवकरात लवकर शाळांच्या खात्यावर पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सावित्रीच्या लेकींना सायकली लवकरच मिळण्याची शक्यता आहे.