Crop Damage Compensation : अतिवृष्टीची नुकसानभरपाई शासनाने दिलीच नाही
Wardha जुलै महिन्यात जिल्ह्यात अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. सात जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. यात जनावरांच्या मृत्यूसह घर पडझडीच्या घटनाही घडल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने त्याच्या नोंदी घेऊन ४९.८२ लाखांचा मदत प्रस्ताव शासनाकडे पाठविला आला होता. त्याला सहा महिने लोटूनही निधी मिळाला नसल्याने पीडितांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे.
पावसाळ्याचा पहिला महिना जिल्ह्यात कोरडा गेला होता. नंतर झालेल्या पावसाने दाणादाण उडविली होती. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. या अतिवृष्टीत ठिकठिकाणी पुराच्या घटनेत तसेच वीज पडल्याने मृत पावणाऱ्यांची संख्या सातवर पोहोचली होती. ६२ जनावरे मृत्युमुखी पडली होती. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य करण्यासासाठी प्रतिव्यक्ती चार लाखांप्रमाणे २४ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवविण्यात आला होता. एका व्यक्तीचा मृतदेह आढळून न आल्याने त्याला या यादीतून वगळण्यात आले होते.
Nagpur airport : विमानतळ विस्तरिकरणातून उद्योगांना ‘बूस्टर डोस’
जखमी व्यक्तींसाठी प्रती व्यक्ती ५ हजार ४०० रुपयेप्रमाणे २१ हजार ६०० रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. तर मृत जनावरांसाठी १७ हजार रुपये प्रति जनावर असा प्रस्ताव गेला. एकूण १३ लाखांचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला होता. मात्र, अद्यापही शासनाकडून यासंदर्भात निधी प्राप्त न झाल्याने अतिवृष्टीत बाधित नागरिकांना मदतीची प्रतीक्षा आहे.
जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे १ हजार ७१ घरांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली होती. यात पूर्णत: नुकसान झालेल्या ५ घरांचा समावेश होता. तर अंशत: नुकसान झालेल्या घरांची संख्या सर्वाधिक म्हणजेच १ हजार ६६ एवढी होती. तर २५ गोठ्यांचे नुकसान झाले होते. पूर्णत: घर पडल्यासाठी १ लाख रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले. तर अंशत: घराच्या पडझडीसाठी ६ हजार ५०० रुपये आणि गोठ्याच्या नुकसानासाठी ३ हजार रुपये मिळणार आहेत. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.








