व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home प्रशासकीय Nagpur airport : विमानतळ विस्तरिकरणातून उद्योगांना ‘बूस्टर डोस’

Nagpur airport : विमानतळ विस्तरिकरणातून उद्योगांना ‘बूस्टर डोस’

Booster dose’ to industries from Nagpur airport expansion: कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले

Nagpur डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरणाच्या माध्यमातून उद्योगांना booster dose मिळेल. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी Nagpur collector डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

औद्योगिक क्षेत्रासह रोजगार निर्मितीला मोठा हातभार लागणार आहे. या विस्तारीकरणात भारतीय वायुदलाकडील जमिनीचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना हस्तांतरीत केलेल्या नवीन जागेवर स्थलांतरीत होण्यासाठी प्रलंबित बाबी तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश इटनकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी हे MADC चे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी शनिवार, दि. 4 जानेवारीला भारतीय वायुदलाच्या सोनेगांव येथील कार्यालयात व्यापक बैठक घेतली.

Questions for cotton growers : CCI ची भलती अट; मग त्यांनी कापूस विकावा कुणाला ?

विदर्भाच्या विकासातील एक प्रमुख मापदंड म्हणून याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी जमिनीचे पूर्ण हस्तांतरण व इतर बाबींची पूर्तता तत्परतेने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी गावठाणात त्वरीत स्थलांतरीत करण्याबाबत व संपादीत जागेवरील अतिक्रमीत बांधकामे हटविण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. त्यांनी यावेळी विमानतळ विस्तारीकरणात येणाऱ्या व भारतीय वायुदलास हस्तांतरीत केलेल्या जागेची भारतीय वायुदल, मिहान इंडिया MIHAN व MADC च्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी केली.

error: Content is protected !!