व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mahayuti Government : अमरावती रेल्वे उड्डाणपूल निर्मितीसाठी १२५.३७ कोटींचा निधी

Mahayuti Government : अमरावती रेल्वे उड्डाणपूल निर्मितीसाठी १२५.३७ कोटींचा निधी

₹125.37 crore sanctioned for construction of Amravati railway flyover : आगामी अर्थसंकल्पात तरतूद; तात्पुरत्या सुधारणांसाठी २ कोटींचा आराखडा मंजूर होणार

Amravati गेल्या चार महिन्यांपासून अमरावतीतील रेल्वे उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दूर करून सार्वजनिक वाहतूक सुलभ करण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत आमदार सुलभा खोडके यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या कामकाजात लक्षवेधी सूचना मांडली.

रेल्वे उड्डाणपुलाच्या नव्या बांधकामासाठी १२५.३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, तसेच पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात ‘लाईट व्हेईकल’ वाहतूक सुरू करण्यासाठी दुरुस्तीकरिता २ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

ZP Elections : इच्छुकांची बॅनरबाजी, स्वतःच केली उमेदवारी जाहीर

दरम्यान, याच विषयावर आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेतही लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आगामी मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमरावती येथील रेल्वे उड्डाणपूल निर्मिती प्रकल्पासाठी १२५.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच तात्पुरत्या सुधारणा करण्यासाठी २ कोटी रुपयांचा आराखडाही मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

error: Content is protected !!