Mahayuti Government : सरकारच्या परवानगीने १५ रुपयांची बॉटल २० रुपयांना?

A bottle of Rs 15 for Rs 20 with the permission of the government? : ‘नाथजल’च्या विक्रीतून सर्वसामान्यांची होतेय लूट

Wardha महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक आवारात केवळ ‘नाथजल’ विकण्याची परवानगी दिली आहे. या पाणी बॉटल विकताना काही वितकांकडून मनमानी केली जात आहे. प्रत्यक्ष किमतीपेक्षा अधिक रक्कम घेऊन प्रवासी नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे. नाथजल १५ रुपयांना असतानाही प्रवाशांकडून अतिरिक्त ५ रुपये घेतले जात आहेत.

किमतीपेक्षा जादा रकमेत पाण्याची बॉटल विकल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी महामंडळाला तक्रार पाहिजे आहे. या भानगडीत कोणताही प्रवासी पडत नसल्यामुळे नाथजल विक्रेत्यांचे चांगभलं होत आहे. महामंडळाकडून कारवाईच होत नसल्यामुळे विक्रेत्यांना भीती उरली नाही. नाथजल पाण्याची बॉटल १५ रुपयांची आहे. याच किमतीत बसस्थानकात विक्री व्हावी, असे स्पष्ट आदेश महामंडळाकडून देण्यात आले आहे.

Akash Fundkar : काळ बदलला, पोलीस खातेही बदलायला हवे!

प्रत्यक्ष जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर काही विक्रेत्यांकडून ही बॉटल सर्रास २० रुपयांना विकली जात आहे. बाहेरगावाहून एसटी स्थानकात पोहोचल्यानंतर जास्त वेळ थांबत नाही. त्यामुळे प्रवासी बसस्थानकाच्या बाहेरून जाऊन पाणी आणण्याच्या भानगडीत पडत नाहीत. याचाच गैरफायदा काही विक्रेत्यांकडून घेतला जात आहे. कडक उन्ह तापायला सुरुवात झाल्यावर थंड पाण्यासाठी जास्त पैसे विक्रेत्यांकडून आकारले जाऊ शकतात.

कुठल्याही बसस्थानकावर १५ रुपयांपेक्षा अधिक किंमत नाथजल पाण्याच्या बॉटलची घेत असल्यास संबंधित गावातील बसस्थानक प्रमुख अथवा आगार व्यवस्थापकांकडे तक्रार करता येते. या तक्रारीवर चौकशी होऊन जादा दरात पाण्याची बॉटल विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येते. एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. परंतु नागरिकांनी सजग राहून तक्रार करण्याची आवश्यकता आहे.

Sudhir Mungantiwar : स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी स्वावलंबनाचा भक्कम पाया ठरेल

बसस्थानकाच्या आवारात नाथजल विक्री करणारे हॉकर्स जादा रक्कम आकारतात. काही नागरिक बॉटलवरील किंमत पाहून तेवढीच किंमत देण्याचा प्रयत्न करतात. याच प्रकारावरून हॉकर्स आणि प्रवाशांमध्ये वादाच्या घटना होतात. या बाबी टाळण्यासाठी महामंडळाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

वर्धा जिल्ह्यात 5 आगार आहेत. बसस्थानकावर नाथजल पाण्याची बाॅटल विक्री केली जाते. परंतु या आगारातून काही हॉकर्सकडून जादा रक्कम बाॅटलसाठी घेतली जाते.