Farmers launch indefinite hunger strike to reopen blocked farm road : गैरजमीनदारांच्या कारस्थानाविरोधात आंदोलन; शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Buldhana तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील गट क्रमांक २५४ मधून जाणारा वडिलोपार्जित शेतरस्ता अडविण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खरीप पिकांचे नुकसान सहन करीत असलेले शेतकरी आता संतप्त झाले असून महिलांसह शेतकऱ्यांनी शेतरस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा रस्ता पूर्व–पश्चिम दिशेचा जुना बैलगाडी मार्ग असून गावकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र काही गैरजमीनदारांनी संगनमत करून कारस्थान रचले व गट क्रमांक २५४ मधील शेतजमिनीचा दक्षिण–उत्तर नाला खोदून हा रस्ता बंद केला. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला; तरीही तो निष्फळ ठरला.
२०२३ पासून हा रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांना खते, बियाणे व शेतीची अवजारे डोक्यावर वाहून न्यायची वेळ आली आहे. या संदर्भातील दावा न्यायप्रविष्ट असूनही तहसीलदारांनी कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.उपोषणाची पूर्वकल्पना तहसीलदारांना दिली होती. त्यांनी स्थळी भेट दिली असली तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.
Janshakti Shetkari Sanghatana : महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे दादांना ‘धरण’ सारखे जड जाणार?
आठ महिला व दहा पुरुष उपोषणाला बसले असून दोन महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शेतकऱ्यांचा इशारा – जर रस्ता तातडीने खुला झाला नाही, तर लढा आणखी तीव्र केला जाईल. शासनाने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी उपोषणस्थळी करण्यात आली.आधीच शेतकरी विविध कारणांनी त्रस्त असताना त्यातच शेतरस्त्यासाठी आता शेतकऱ्यांना आंदाेलन करावे लागत आहे.








