hunger strikes against illegal activities : आझाद हिंदचा एल्गार; अवैध धंद्यांच्या विरोधात आंदोलन
Buldhana सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, उपोषण, सत्याग्रह करणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन किंवा उपोषण करता येणार नाही, असा फतवाच काढण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अकरा ज्वलंत नागरी समस्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युसुफ यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. येथील जिजामाता स्टेडियमच्या प्रांगणात हे आमरण उपोषण सुरू आहे.
विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मागण्यांची दखल घेतली जावी, अशी त्यांची अपेक्षा होती. पण अधिवेशनाचा अखेरचा दिवस आला तरीही सरकारने उपोषणाला गांभिर्याने घेतलेले नाही. आंदोलन करण्यास घालण्यात आलेली बंदी त्वरित उठवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
Mahayuti Government : १२ कोटीत बांधले, ४३ लाखांची दुरुस्ती काढली!
जिल्हाधिकारी तसेच प्रशासकीय कार्यालयांना लागून सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत. शहरातील प्रत्येक चौकात महिलांसाठी मोफत शौचालय आणि प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी. गहाळ झालेल्या मुलामुलींचा शोध लावावा. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा दर कमी करावा. उपवनसंरक्षक कार्यालयातील गैरव्यवहारांची चौकशी करावी. अनधिकृत रेती वाहतूक थांबवावी. सामाजिक कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.
या आणि अन्य नागरी समस्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटना, अल्पसंख्यांक पिचडा वर्ग संघटना, समाजवादी पार्टी, रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड आणि आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला निवेदन दिले होते. मात्र निवेदनातील मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे सय्यद युसुफ यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.








