Irrigation building built for 12 crores, 43 lakhs will be spent on repairs : सिंचन भवनाच्या दुरुस्तीची निविदा; एवढा खर्च कशासाठी?
Amravati येथील सिंचन सेवा भवनाच्या नूतनीकरणासाठी आधीच १२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पण तरीही आता त्याच इमारतीतील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी ४२ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
सदर दुरुस्ती व नूतनीकरणाची जबाबदारी जेल रोडवरील अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्रमांक १ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता गणेश कथले यांनी यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. २४ मार्च रोजी ही निविदा उघडण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या दुरुस्तीबरोबरच निम्न पेढी प्रकल्पांतर्गत पुनर्वसित पाच गावांमधील पाच सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी ७७.१४ लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
मात्र, मुख्य अभियंता कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी निम्न पेढी प्रकल्पातील निधीचा वापर का केला जात आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे. सिंचन सेवा भवनाच्या नूतनीकरणासाठी जिगाव प्रकल्पातून १२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यातच मुख्य अभियंता कार्यालयाचा दुसरा मजला समाविष्ट नव्हता का? आणि आता ४२ लाखांचा अतिरिक्त खर्च कशासाठी? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
District Hospital : उपचारासाठी आला, महिला कर्मचाऱ्याची छेड काढली!
यासंदर्भात मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) जगत टाले यांनी सांगितले की, “आमचे कार्यालय सिंचन सेवा भवनात असले तरी, १२ कोटींच्या निविदेत आमचा मजला समाविष्ट नव्हता. अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाने काढलेल्या ४१.९३ लाखांच्या निविदेतून आमच्या मजल्यावरील टॉयलेट ब्लॉक आणि एस्टाब्लिशमेंट सेक्शनमधील कामे केली जाणार आहेत.”








