khamgaon-rural-administration-collapse-26-villages-without-sarpanch-and-police-patil : ग्रामीण प्रशासनाचा कणा मोडला; ७१ ग्रामपंचायतींची मुदत संपली, तर ४७ गावांत पोलीस पाटील पदे रिक्त
Khamgao ग्रामीण भागातील लोकशाहीचा कणा मानली जाणारी ग्रामपंचायत आणि कायदा-सुव्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा असलेले पोलीस पाटील, ही दोन्ही पदे खामगाव तालुक्यातील तब्बल २६ गावांमध्ये रिक्त आहेत. यामुळे या गावांचा गाडा अक्षरशः रुतल्याचे चित्र असून, साध्या दाखल्यापासून ते गावातील वादांपर्यंतच्या सर्वच गोष्टींसाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण कारभार पूर्णपणे ठप्प झाला आहे.
तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींची मुदत संपून अनेक महिने उलटले आहेत. विविध तांत्रिक आणि राजकीय कारणांमुळे निवडणुका रखडल्याने सध्या सरपंच पदे अस्तित्वात नाहीत. अनेक गावांमध्ये लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर अद्याप प्रशासकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारी विकासकामे आणि दैनंदिन निर्णयप्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. गावातील साफसफाई, दिवाबत्ती आणि पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देणारे कोणीही नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील ४७ गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील हे गाव आणि पोलीस स्टेशन यांमधील महत्त्वाचा दुवा असतात, मात्र हे पद नसल्याने गावात होणारे किरकोळ तंटे किंवा वादांवर स्थानिक पातळीवर तोडगा निघत नाही. साध्या प्रकरणांसाठीही नागरिकांना थेट तालुका पोलीस ठाण्याची पायपीट करावी लागत आहे. पोलीस पाटील भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने ही पदे रिक्तच आहेत.
Eknath shinde : सलमान खान भारतीय नागरिक; आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात गैर काय?
तालुक्यातील पातोंडा, वाकूड, निपाणा, चितोडा, आसा, हिवरा बु., मांडका, विहीगाव, वाडी, पारखेड, पिंप्री देशमुख, दधम, अंबिकापूर, कारेगाव बु., पिंप्री कोरडे, जनुना, ज्ञानगंगापूर, संभारपूर, पळशी बु., निळेगाव, ढोपगाव, टेंभुर्णा, पिंप्री गवळी, गारडगाव, शिराळा आणि रामनगर या २६ गावांमध्ये दोन्ही पदे रिक्त असल्याने इथली परिस्थिती अत्यंत बिकट आहे.








