Breaking

Mahayuti Government : अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा, प्रशासन लागले कामाला

Legislative Assembly Scheduled Tribes Welfare Committee to conduct tour : विधानमंडळ समिती १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान घेणार विकासकामांचा आढावा

Amravati विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती १९ ते २१ ऑगस्टदरम्यान अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, विकासकामांची पाहणी आणि विभागीय कामकाजाचा सविस्तर आढावा घेणार आहे. या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत तयारीला वेग आला आहे.

विधिमंडळ सचिवालयाने नियोजित केलेल्या या दौऱ्यात समिती जिल्ह्यातील अनुसूचित जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचे निरीक्षण, अंमलबजावणीतील अडचणी आणि विविध विभागांचा अहवाल घेणार आहे.

Local Body Elections : स्थानिक निवडणुकांसाठी भाजपने थोपटले दंड!

१९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृहात समिती दाखल होईल. त्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत अनुसूचित जमातींसंबंधी कल्याणकारी योजना व अडचणींवर अनौपचारिक चर्चा होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात भरती, बढती, आरक्षण, अनुशेष, जातपडताळणी तसेच आदिवासी क्षेत्रातील योजनांवर अधिकाऱ्यांशी बैठक होईल. यावेळी पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, वीज वितरण कंपनी, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि एसटी महामंडळ यांचाही आढावा घेतला जाईल. दुपारी २.३० वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात, ३.३० वाजता जिल्हा परिषदेत आणि सायंकाळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात बैठका होतील.

२० ऑगस्ट रोजी समिती आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह तसेच जिल्हा परिषद आणि शासनाच्या विविध प्रकल्पांना भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करेल.

२१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता महानगरपालिकेत आढावा बैठक होईल. दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांची अंतिम आढावा बैठक घेण्यात येईल.

Vote theft case : निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुलं !

विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीत एकूण १६ आमदारांचा समावेश असून, विधिमंडळ सचिवालयातील वरिष्ठ अधिकारीही समितीसोबत दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत तयारीला सुरुवात झाली आहे.