‘Mahakrishi’ scheme provides energy for irrigation : शेतकऱ्यांची दिवसाच्या वेळी होतेय सिंचनाची सोय
Wardha शेतकरी हा देशाच्या पाठीचा कणा आहे. त्याला आणखी बळकट करण्यासाठी. पर्यावरणस्नेही उर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा सुनिश्चित वीज पुरवठा व्हावा. यासाठी शासनाने राज्यात कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर उर्जेव्दारे विद्युतीकरणाचे अभियान हाती घेतले आहे. यातून महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना दिवसाची सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
राज्यात बहुतांश वीज निर्मिती औष्णिक पद्धतीने होत आहे. यासाठी वापरण्यात येणारी खनिज संपत्तीची उपलब्धता मर्यादित प्रमाणात आहे. त्यामुळे पर्यावरण पोषक तसेच दिर्घकालीन ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी शासानाने प्रोत्साहनात्मक धोरण जाहीर केले आहे. पारेषण विरहीत सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सौर कृषीपंप वाटप करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कुसुम घटक-ब योजनेंतर्गत लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार ३ एच.पी., ५ एच.पी. व ७.५ एच.पी. व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती डी.सी.सौरपंप उपलब्ध होतात. सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांना कृषीपंप किंमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के हिस्सा भरावा लागतो. सौर कृषीपंपाद्वारे उपलब्ध होणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्याला जर इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी युनिव्हर्सल सौरपंप कंट्रोलरचा वापर करता येईल, मात्र त्यासाठीचा खर्च संबंधित लाभार्थ्याने करावयाचा आहे.
Animal Husbandry Department on ‘alert mode’ : बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी Rapid Response Team!
पारंपरिक वीज कनेक्शन नसणारे शेतकरी आणि शेत सिंचनाकरिता शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी, नाले इत्यादी शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी निवडीसाठी पात्र ठरतील. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा-१ व २ किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतील. २.५ एकर शेत जमीन धारकास ३ एच.पी., ५ एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ एच.पी. व त्यापेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यास ७.५ एच.पी. पंप किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सौरकृषी पंप मिळतील.








