Mahayuti Government : नेरी ठरणार सर्वात मोठे ‘सौरग्राम’!

 

Neri will be the largest ‘solar village’ : जिल्हा नियोजन समितीचा निधी वापरून निर्माण केला आदर्श

Wardha सौरउर्जेचे महत्त्व जाणत वर्धा जिल्ह्याअंतर्गत आर्वी तालुक्यातील नेरी (पुनर्वसन) गावाने शंभर टक्के सौरग्राम होण्याचा मान मिळविला आहे. राज्यातील सर्वात मोठे सौरग्राम होण्याचा मान मिळविला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ही किमया करून दाखविली आहे.

सौर उर्जेच्या प्रकाशात झळकणाऱ्या गावात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही किमया साध्य करणाऱ्या या गावाने संपूर्ण राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान २ गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून या मोहिमेंअर्गत वर्धा जिल्ह्यातील चिचघाट-राठीच्या पाठोपाठ या नेरी (पुनर्वसन) गावातील सर्व १३२ घरगुती ग्राहक आणि ग्रामपंचायतीने त्यांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारली आहे. गावाची सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे १५० किलोवॅट झाली आहे.

वर्धा शहरापासून ५० किमी तर आर्वीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेले आणि महावितरणच्या आर्वी उपविभाग अंतर्गत असलेल्या नेरी (पुनर्वसन) या गावाला सौरग्राम करण्यासाठी आर्वी पंचायत समितीने वर्षभर स्वच्छ सूर्यप्रकाशाचा वापर करून वीजनिर्मिती करण्याचा मानस केला. ‘पंतप्रधान सूर्यघर’ मोफत वीज योजनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव तयार केला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला.

Mahayuti Government : ग्रामपंचायतींची गृह, पाणी कर वसुली ५० कोटींवर!

त्यानंतर सौरऊर्जेचे महत्त्व जाणून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील त्यास अनुकूल प्रतिसाद देत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावास मंजुरी देत सौर ऊर्जीकरण करुन एकजुटीने ‘सौर’ उड्डाण यशस्वी केले. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्राचे अत्यंत उत्कृष्टरित्या सक्षमीकरण आणि नूतनीकरण करण्यात आल्यामुळे महावितरणच्या आर्वी पाठोपाठ हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव या ३३/११ केव्ही उपकेंद्राला आयएसओ मानांकन मिळाले.

Mahayuti Government : स्वावलंबी योजनेसाठी यंत्रणा परावलंबी!

आर्वी उपकेंद्रालाही हा बहुमान मिळाला आहे. हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव येथील उपकेंद्रावरील सर्व वीज ग्राहकांना २४ बाय ७ वीज वितरण केले जाते. महावितरणच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ अर्थात ग्राहकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. आय.एस.ओ. मानकानुसार उपकेंद्रात झालेल्या उत्कृष्ट कामाचा फायदा ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याकरिता होणार आहे.