व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mahayuti Government : भंडाऱ्याचा कारभार १९१ किलोमीटर लांबून !

Mahayuti Government : भंडाऱ्याचा कारभार १९१ किलोमीटर लांबून !

 

Sanjay Savkare becomes guardian minister of Bhandara : पालकत्व संजय सावकारे यांच्याकडे

Bhandara भंडारा जिल्ह्याला भुसावळचे संजय सावकारे पालकमंत्री म्हणून लाभले आहेत. भूसावळ ते भंडारा हे अंतर १९१ किलोमीटरचे आहे. त्यामुळे आता भंडाऱ्याचा कारभार एवढ्या लांबून चालणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, समृद्धी महामार्गाने हे अंतर ७ तास ४१ मिनिटांचे आहे. पण ही सोय आहे म्हणून भंडाऱ्याकडे लक्ष ठेवणे त्यांना शक्य होणार आहे का, हा प्रश्न आहे.

स्थानिक पालकमंत्री मिळण्याची अपेक्षा धुळीस मिसळल्यावर आता पुन्हा दूरच्या अंतरावरील पालकमंत्री देऊन भंडारा जिल्ह्याच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसली आहे. भुसावळ मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले संजय सावकारे यांच्याकडे आता जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोबविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा दूरचेच पालकमंत्री जिल्ह्याला मिळाल्याची प्रतिक्रिया उमटायला लागली आहे.

Nagpur Municipal Corporation : तक्रार निवारण करण्यात मनपाला ‘फाईव्हस्टार रेटिंग’

भंडारा जिल्ह्याला जवळचे पालकमंत्री मिळतील, अशी अपेक्षा होती. वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी अपेक्षा होती. मुंबई स्तरावर तशा हालचाली होतानाही दिसत होत्या. मात्र अचानकपणे संजय सावकारे यांचे नाव जाहीर करून भंडारा जिल्ह्यातील जनतेला धक्कातंत्राचा अनुभव या निमित्ताने आला आहे.

Nagpur Municipal Corporation : तक्रार निवारण करण्यात मनपाला ‘फाईव्हस्टार रेटिंग’

शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे आधीपासूनच स्थानिक पालकमंत्री असावे, यासाठी आग्रही होते. या सोबतच, अनेक राजकीय मंडळींचीही हीच अपेक्षा होती. या संदर्भात, भोंडेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, स्थानिक पालकमंत्री मिळाले असते, तर आनंदच झाला असता, अशी प्रतिक्रिया नोंदविली. संजय सावकारे हे अनुभवी राजकीय व्यक्तीमत्व असून राजकारणाचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविले आहे, हे विशेष.

error: Content is protected !!