Supply of contaminated water to villages in Morkhed : पाणीपुरवठा योजनेतच गडबड; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
Malkapur “पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्काकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला शिवसेना गप्प बसू देणार नाही,” असा इशारा देत शिवसेना (उबाठा) मलकापूर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील ‘मोरखेड १० गाव’ पाणीपुरवठा योजनेतील दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याविरोधात तातडीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामध्ये खामखेड, पि. महादेव, गौलखेड, वडजी, हरणखेड, जांबुळधाबा, दुधलगाव, लोणवडी, आळंद व मोरखेड या गावांतील ग्रामस्थांना मिळणाऱ्या दूषित पाण्यामुळे गंभीर आरोग्यसंकट निर्माण झाले असल्याचे नमूद केले आहे.
चांभारे यांनी या गावांमध्ये स्वतः पाहणी करून, पाण्याचा रंग तपकिरी असून त्याला प्रखर दुर्गंध आहे, असे निदर्शनास आणून दिले. या पाण्यामुळे कॉलरा, टायफाईड, पोटदुखी, कावीळसारख्या आजारांचे प्रमाण वाढले असून, आरोग्य यंत्रणा देखील पुरेशी दक्षता घेत नसल्याची संतापजनक परिस्थिती आहे.
Chandrashekhar Bawankule : बायोमेट्रिक अथवा फेस अटेंडन्सशिवाय पगार नाही
उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दूषित पाण्याची बाटली दाखवली. पाण्याचा दुर्गंध पाहून पवारही अचंबित झाले. त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
Mahayuti Government : विकासकामांना खीळ! साडेतीन महिन्यांनंतरही आमदार निधी नाहीच
या समस्येवर त्वरीत उपाय न झाल्यास शिवसेना मलकापूर तालुका पातळीवर तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी उपतालुका प्रमुख राजेंद्र काजळे, विभाग प्रमुख गणेश सुशीर, तथा स्वप्नील लोड उपस्थित होते.