Breaking

Akola MNS : शाळांमध्ये सिक रूम बंधनकारक करा !

Make Sick Room Mandatory in School of Akola district : मनसेची शिक्षण विभागाकडे मागणी

Akola जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत आजारी विद्यार्थ्यांवर प्रथमोपचार करण्यासाठी शाळांमध्ये सिक रूम असणे बंधनकारक करावे. या संदर्भात शासनाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. याविषयी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. तसेच अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

अकोला जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. तसेच उन्हाळ्यात तापमान 45 डिग्रीच्या वर जात असते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत असतो. तसेच सध्या HMPV नावाचा वायरस मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. त्याच्या खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तात्काळ करण्यात यावी. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचाराची गरज भासू शकते‌.

Shock for Congress in Balapur : बाळापूरमध्ये काँग्रेसला धक्का !

शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांना शाळेमध्ये प्राथमिक उपचारासाठी बोलावण्यात यावे. अशी कोणत्याच प्रकारची उपाययोजना शाळा व महाविद्यालय यांच्याकडून होताना दिसत नाही. उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन राज्य शासनाला आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी शाळांमध्ये करून एक ‘सिक रुम’ तयार करण्यात यावी. यासंदर्भातील आदेश सर्व शाळांमध्ये देण्यात यावे. अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

CM Devendra Fadnavis : नवेगाव बांधमधील ‘पर्यटक निवास’ ठरणार आकर्षण

याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, मनसे शहराध्यक्ष सौरभ भगत, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड, तालुका अध्यक्ष विजय बोचरे, महानगर उपाध्यक्ष मुकेश धोंडफळे, विभाग अध्यक्ष राजेश राठी, संतोष बोर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.