Makrand Patil : १.८० लाख शेतकऱ्यांना मिळणार १२१ काेटींची मदत

1.80 lakh farmers to receive assistance of ₹121 crore : आतापर्यंत २१९ कोटी ७० लाख रुपयांची मदत, पालकमंत्र्यांची माहिती

Buldhana जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या १ लाख ८२ हजार ३६८ शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीपोटी १२१ कोटी ८९ लाख ४३ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.

आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपोटी जिल्ह्यातील बाधितांना २१९ कोटी ७० लाख ८२ हजार रुपये इतका मदत निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथ‍ा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी मदत निधीला मान्यता दिली आहे.

Matang community : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही सरकारकडून विलंब

यापुर्वी २२ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अवेळी पाऊसामुळे बाधित १४ हजार ९०९ शेतकऱ्यांना १५ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये इतका मदत निधीस मान्यता दिली आहे. तसेच ६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित ९० हजार ३८३ शेतकऱ्यांना ७४ कोटी ४५ लाख ३ हजार रुपये इतका निधी तर १७ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित ८ हजार ३९७ शेतकऱ्यांना सात कोटी ८० लाख ८६ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Anil Bonde : खासदारांच्या तक्रारीनंतर जागे झाले पालिका प्रशासन

तसेच दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरामुळे बाधित १ लाख ८० हजार ३६८ शेतकऱ्यांना १२१ कोटी ८९ लाख ४३ हजार रुपये निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.