Guardian Minister claims to overcome the humani worm crisis : मकरंद पाटील जिल्ह्यात, हुमणी अळी संकटावर मात करण्याचा दावा
Buldhana जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाबरोबरच हुमणी अळीच्या प्रादुर्भवाने त्रस्त असताना पालकमंत्री मकरंद पाटील यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत होती. अखेर पालकमंत्री सक्रिय झाले आहेत.
जिल्ह्यातील सोयाबीन व मका पिकांवर आलेल्या हुमणी अळीच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी, या संकटसमयी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, तातडीने मदत मिळावी यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आज दिली.
प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ३१३ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्रातील पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे व तज्ज्ञांच्या मदतीने हुमणी अळी नियंत्रणासाठी उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत.
Chandrashekhar Bawankule : ‘डीपीसी’च्या बैठकीचा पालकमंत्र्यांना पडला विसर!
पालकमंत्र्यांनी केवळ प्रशासनिक जबाबदारी निभावत नसून, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतः पुढाकार घेत राज्य शासनाच्या वतीने तातडीने उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. “नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांवर संकट येते, त्यावेळी त्यांच्यामागे शासनाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार शेतीविषयक संकटांबाबत अत्यंत संवेदनशील आहे,” असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Local Body Elections : स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवी कार्यकारीणी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जारी केलेल्या बुलेटिनच्या आधारे, हुमणी अळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापनाची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी तज्ज्ञांच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी विविध जैविक व रासायनिक उपायांचे मार्गदर्शन केले आहे.








