Makrand Patil : निकृष्ट दर्जाचा पूल बांधला, पालकमंत्र्यांना घेरले

Guardian Minister surrounded for construction of substandard bridge : दाताळा–शिराढोण मार्गावरील घटना, चौकशीची मागणी

Malkapur दाताळा–शिराढोण मार्गावरील छोट्या पुलाचे (बॉक्स कलव्हर्ट) काम निकृष्ट दर्जाचे, चुकीच्या अंदाजपत्रक व आराखड्यामुळे पूल वाहून गेल्याच्या प्रकरणी परिसरातील शेतकरी व शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांना दाताळा येथे घेराव घालून चौकशीची मागणी केली.

या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर प्रतिसाद देताना पालकमंत्री पाटील यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पुलाची ठोस दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. तसेच तात्पुरत्या मार्गाची व्यवस्था करण्यासह निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Heavy Rain : पाण्याच्या वेढ्यात कमळजा माता मंदिर; तरीही भाविकांचा ओढा

घेरावावेळी शिवसेना तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्यासह किशोरसिंह राजपूत, गोपाळ पाटील, प्रवीण पाचपोर, सुभाष पाटील, कैलास इंगळे, भावसिंग राजपूत, दशरथसिंग राजपूत, सोपान तळोले, दिनकर तळोले, प्रशांत तळोले, कुणालसिंह राजपूत, भगवान नारखेडे, सोपान नारखेडे, गजानन कोल्हे, धनराज कोल्हे, पुरुषोत्तम पाटील, प्रकाश सुशीर, निलेश सुशीर, अतुलसिंह राजपूत, मधुकर तळोले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.