court’s slap on the fake narrative of Hindu terrorism, BJP reacted : मालेगाव निकालाचे अकोला भाजपकडून स्वागत, १७ वर्षांनी न्याय
Malegao case resultमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे ‘भगवा आतंकवाद’ किंवा ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा खोटा प्रचार फोल ठरला असून, काँग्रेसला जोरदार चपराक बसली आहे, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी व सुधाकर द्विवेदी यांच्यावर अन्यायाने गुन्हे दाखल करून अमानुष छळ करण्यात आला, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. १७ वर्षांनी न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्ततेमुळे हिंदू समाजाच्या विरोधात रचलेल्या फसव्या राजकीय कटाचे खोटेपण उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकले, वसंत खंडेलवाल, संतोष शिवरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल, किशोर पाटील, सुमनताई गावंडे, वैशालीताई निकम, चंदाताई शर्मा, जयश्रीताई फुंडकर, मोनिकाताई गावंडे, वैशालीताई शेळके यांच्यासह इतर नेत्यांनी या निकालाचे स्वागत केले.
Manikrao Kokate : माणिकराव शिवारातून बाहेर… पण ‘मैदाना’त कायम?
काँग्रेसने हिंदू दहशतवादाचा शब्द वापरून समाजात विष पेरण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जरी नंतर क्षमायाचना केली असली, तरी कॉंग्रेसने या शब्दाचा प्रचार सुरूच ठेवला. प्रणिती शिंदे यांनी संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ हा तमाशा असल्याचे म्हणणे, हा शहिदांचा अपमान आहे, असा आरोपही नेत्यांनी केला.
काँग्रेसने अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करत हिंदू समाजाला बदनाम करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला, हे या खटल्यातून स्पष्ट झाले असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
Maharashtra politics : महायुतीत अंतर्गत तणाव, राजकीय वर्तुळात घडामोडी
“कॉंग्रेसने हिंदूविरोधी राजकारण थांबवावे, अन्यथा हिंदू समाज माफ करणार नाही,” असा स्पष्ट इशारा आमदार रणधीर सावरकर यांनी दिला. “दहशतवादाला धर्म नसतो. मात्र देशात घडलेल्या अनेक विध्वंसक कारवाया या पाकिस्तानपुरस्कृत मुस्लिम दहशतवाद्यांकडूनच झाल्या, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे,” असे भाजप नेत्यांनी नमूद केले.








