Mangeshkar Hospital : चौकशी समितीचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका !

CM Devendra Fadnavis said that action will be taken against the culprits : तनिषा भिसेंना अॅडमिट करून न घेणे ही चूक

Pune: १० लाख रुपये अग्रीम रक्कम न भरल्यामुळे तनिषा भिसे या महिलेला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अॅडमिट करून घेतले नाही. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. तिला उपचारार्थ दाखल करून न घेणे, ही रुग्णालयाची चूक आहे, असा ठपका चौकशी समितीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनावर ठेवला आहे.

तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्यानंतर चौकशीसाठी काही समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यातील आरोग्य विभागाची महत्वाची समिती आहे. या समितीने आपला प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला. यामध्ये रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. तनिषा भिसेंना अॅडमिट करून न घेणे ही मोठी चूक आहे. त्यामुळे रुग्णाला मृत्यूला सामोरे जावे लागले, असे या समितीने आपल्या प्राथमिक अहवाला म्हटले आहे.

प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केल्यानंतर रुग्णालयातील सर्व कागदपत्रांचा अभ्यास ही समिती करणार आहे. त्यानंतर सविस्तर अहवाल सादर केला जाईल. दरम्यान यापुढे कुठल्याही रुग्णाला दाखल करून घेताना अग्रीम रक्कम घेतली जाणार नाही, असा निर्णय मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाने घेतला आहे. एक जीव गेल्यानंतर या रुग्णालयाला उपरती झाली, अशी टिका आता केली जात आहे.

Mahayuti Government : हजारो बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतनाचा दिलासा!

घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली होती. दोषींवर कारवाई करून मृताच्या कुटुंबियांना न्याय देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. भविष्यात राज्यात कुठेही अशा घटना घडू नये, याची काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Vijay Wadettiwar : कृषीमंत्र्यांची भाषा अजूनही अरेरावीची !

रुग्णालयाचा माज उतरवणार का ?
दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. चौकशी समिती एक ढोंग आहे. या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा माज सरकार उतरवणार का, असा सवाल त्यांनी केला आहे. तर काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून सरकारचा समाचार घेतला. हे सरकारचे पाप आहे. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.