Played rummy Agriculture department will go but ministerial post will remain: रमी खेळणे भोवले, पण मंत्रीपद वाचणार, क्रीडा खाते येण्याची शक्यता
Mumbai : सभागृहात रमी खेळण्याचा ‘खेळ’ महागात पडतोय, पण खुर्ची मात्र वाचली आहे! कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ‘खेळप्रेमी’ वृत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. ‘राजीनामा द्या’चा गजर सुरू असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. कोकाटेंचं कृषीखातं जाणार, पण मंत्रीपद मात्र अबाधित राहणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असून त्यांना दुसरं ‘क्रीडा’ खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. म्हणजे ‘रमी’च्या पत्त्यांतून थेट ‘खेळ’ खात्यावर झेप! सध्या हे खातं दत्तात्रय भरणे यांच्या ताब्यात आहे, आणि आता त्यांच्याकडे कृषीखात्याची सूत्रं सोपवली जाण्याची चर्चा आहे.
Maharashtra politics : महायुतीत अंतर्गत तणाव, राजकीय वर्तुळात घडामोडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात या खात्यांच्या अदलाबदली बाबत गुपचूप बैठकही झाल्याची माहिती आहे. राजीनामा नको, पण उत्तरदायित्वाची झळ लागू नये, म्हणून खातेबदलाचा हा ‘सुवर्ण’ मार्ग निवडण्यात आल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, कृषी खात्याची खुर्ची रिकामी होताच, धनंजय मुंडेंच्या हालचालींना वेग आला आहे. पूर्वी त्यांच्यावर कृषी विभागात गैरव्यवहाराचा आरोप झाला होता, पण न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिल्यानंतर आता ‘माझं जुनं प्रेम परत मिळो’ अशा थाटात ते पुन्हा कृषी खात्याच्या रांगेत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
फडणवीस आणि मुंडे यांच्यात गुप्त चर्चा झाली होती, त्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीतही पुन्हा बैठक झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबुज आहे की ‘कोकाटेंचा रमी, आणि मुंडेंचा री-एंट्री!’
Big blow to Prahar : बच्चू कडूंना अकोल्यात मोठा धक्का; प्रहारचे उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादीत
कोकाटेंवर थेट कारवाई न होता फक्त खातेबदल करून मामला थोपवला जात असल्याने आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तेवढ्यात कोकाटेंच्या नव्या खात्याची अधिकृत घोषणा झाली, तर त्यांच्या ‘खेळ’त एक नवा ‘पाया’ बसेल अशी कुजबुज सध्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.








