Political parties aggressive on the statement of Agriculture Minister : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचे पडसाद
Buldhana ‘हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला,’ असं वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. त्याला आता तीन दिवस लोटले. पण या विधानावरून राज्याच्या राजकारणात रणकंदन माजले आहे. विरोधकांकडून तर टीका होतच आहे, शिवाय शेतकरी संघटनाही मैदानात उतरल्या आहेत. बुलढाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनीही कोकाटेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
कोकाटेंच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. कृषीमंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत शिवसेना उद्धव सेनेच्या नेत्या जयश्रीताई शेळके यांनी सडकून टीका केली आहे. “एक-एक रुपये घेणारे भिकारडे सरकार आता याच पैशांवर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार आहे,” असं शेळके म्हणाल्या.
Gang rape of a minor girl : परीक्षाकेंद्रावर नव्हे थेट कारागृहात पोहोचला
“शेतकऱ्यांकडून एक-एक रुपया घेणारे भिकारडे राज्य सरकार शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा देऊ शकले नाही. वरून शेतकऱ्यांचीच तुलना भिकाऱ्यांसोबत केली जाते. कृषीमंत्र्यांचे विधान लाजिरवाणे आणि अत्यंत घृणास्पद आहे,” असंही जयश्री शेळके म्हणाल्या.
महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती, मात्र काही लोकांनी त्याचा गैरवापर केल्याचा आरोप शेळके यांनी केला. पीक विमा योजनेचे योग्य लाभ शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करतात, अशी टीका त्यांनी केली.
शेतकरी संघटनाही आक्रमक
कृषीमंत्री काेकाटे यांच्या वक्तव्याचा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी विराेध केला आहे. शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांसाेबत केल्याने आता राज्यभरात या विषयावर राजकारण पेटले आहे.
Dr. Pankaj Bhoyar : वर्धेतील आयुष रुग्णालयाच्या निधीला Green Signal!
काय म्हणाले कोकाटे?
‘आजकाल भिकार्याला सुद्धा एक रुपये भिकेत कुणी देत नाही. आम्ही तर एक रुपयात पीक विमा देत आहोत. यामुळे दुसऱ्या राज्यातील लोकांनी अर्ज भरल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेले आहेत. यासाठी या योजनेचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे विधान त्यांनी केले आहे, असं कोकाटे म्हणाले आहेत.