Breaking

Manikrao kokate : कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावर भडकली वंचित !

Vanchit bahujan aaghadi flared up on the statement of the Minister of Agriculture : बहुजन युवा आघाडीचा निषेध; शेतकऱ्यांना भिकारी म्हणणे अवमानकारक

Amravati “आजकाल भिकारी देखील एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला,” असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. या विधानाचा वंचित बहुजन युवा आघाडीने तीव्र निषेध केला आहे. हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारे असल्याची टीका प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

“भिकारी एक रुपया घेत नाही, मात्र सरकार तो स्वीकारते. त्यामुळे सरकार भिकाऱ्यांपेक्षा अधिक भिकार झाले आहे,” अशी जोरदार टीका त्यांनी केली. राज्यकर्ते हे जनतेचे सेवक आहेत, मालक नव्हेत. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांना स्वतःला मालक असल्याचा भास होत आहे, असेही पातोडे यांनी नमूद केले.

कृषिमंत्र्यांनी आपल्या किडनी किंवा मालमत्ता विकून पीक विम्याचा हप्ता भरलेला नाही. हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीला सरकारची ही भिकार मानसिकता जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे.

माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे. शेतकर्‍यांना भिकारी म्हटल्यावरून कार्यकर्ते संतापले आहेत. कोकाटे यांच्या विरोधात वंचित आंदोलनाची भूमिका घेण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. त्यांचे हे वक्तव्य सरकारला अडचणीत आणू शकते, असेही सांगतिले जात आहे.