Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; मुंबई महापालिकेत ठरणार ‘गेमचेंजर’?

Maratha reservation activist throws weight behind Uddhav Thackeray : “आझाद मैदानातील हाल विसरलात का?” मराठा समाजाला जरांगेंची भावनिक साद

Mumbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या BMC Election 2026 मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी राजकीय घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत थेट हस्तक्षेप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपला खुला पाठिंबा जाहीर केला आहे. “मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि तिची अस्मिता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची गरज आहे,” असे म्हणत त्यांनी मराठा समाजाला ‘मशाल’ चिन्हाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसाठी एक विशेष परिपत्रक जारी केले आहे. यात त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांना सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांची आठवण करून दिली आहे. “मराठ्यांनो, आझाद मैदानातील ते आंदोलन विसरलात का? आपल्याला दिलेली जुलमी वागणूक, पाण्याचे कनेक्शन तोडणे, दुकाने आणि टॉयलेट बंद करणे, हे सर्व विसरू नका. आता वेळ आपली आहे, ही लढाई मुंबई वाचवण्याची आणि मराठी अस्मितेची आहे,” अशा जहाल शब्दांत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

Chandrapur shook : चंद्रपूर हादरले, सुभाष कासनगोट्टूवार यांची मनमानी,पट्टे वाटपाचे बनावट सर्टिफिकेट, खोटे शिक्के, फसवणूक !

जरांगे यांनी आपल्या आवाहनात मुंबईसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांचा संदर्भ दिला आहे. “मुंबई ही महाराष्ट्राने विकत घेतलेली नाही, तर ती मराठी माणसाच्या रक्ताने मिळवलेली आहे. हे अस्तित्व टिकवण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांनी मुंबईत ठाकरेंच्या गटाला बळकटी द्यावी,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मुंबईतील लाखो मराठा मतदारांचा कल आता बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sudhir mungatiwar : आम्हाला राम प्रिय अन् काँग्रेसला ‘रम’ प्रिय

मुंबईत मराठा समाजाची लोकसंख्या निर्णायक असून, मनोज जरांगे यांच्या या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. विशेषतः पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मराठा समाज निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी जरांगे यांनी घेतलेली ही भूमिका महायुतीसाठी (भाजप-शिंदे-अजित पवार गट) मोठी डोकेदुखी ठरू शकते.
आता मराठा समाज मनोज जरांगे यांच्या या भावनिक आवाहनाला कसा प्रतिसाद देतो आणि १६ जानेवारीच्या मतमोजणीत याचे पडसाद कसे उमटतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.