Maratha movement : आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास मनाई !

High Court hearing on Manoj Jarange’s protest : मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर उच्च न्यायालयाची सुनावणी

Mumbai : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले की आझाद मैदानात किंवा शहरातील कोणत्याही प्रमुख ठिकाणी आंदोलन करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. न्यायालयाने मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना थेट निर्देश देत म्हटले की परवानगीशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करणे शक्य नाही. त्याचवेळी, सरकारने खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असा सल्ला खंडपीठाने दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अडथळे निर्माण होऊ नयेत, रहदारी विस्कळीत होऊ नये यासाठी न्यायालयाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी आपला संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आम्ही कायदा आणि संविधानाचे सर्व नियम पाळून आंदोलन करू. कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही. आमचे वकील न्यायालयात आपले म्हणणे मांडतील आणि आम्हाला विश्वास आहे की न्यायदेवता आमच्या रास्त मागण्या ऐकेल.

Maratha movement : मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा !

आम्ही 29 ऑगस्टला आझाद मैदानावर पोहोचणारच. उद्या सकाळी दहा वाजता हजारो मराठा बांधवांसह आम्ही मुंबईकडे कूच करतोय. हे सरकारचे खेळ आहेत, पण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये सरकारसमोर काही ठोस मुद्दे आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे मान्य करून त्याची अंमलबजावणी व्हावी, हैदराबाद गॅझेटियरसह सातारा आणि बाँबे गॅझेटियर लागू करावेत, सगे सोयरे अध्यादेश तातडीने लागू करून त्यानुसार नोंदी स्वीकाराव्यात, आंदोलनादरम्यान नोंदवलेल्या गुन्ह्यांची मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि मराठा समाजाला कायद्यानुसार टिकणारे आरक्षण द्यावे.

Sanjay Sawkare : पालकमंत्रीपद सोडण्यासाठी संजय सावकारेंवर दबाव !

,या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांवर तोडगा निघाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांचा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीवरून निघणार असून पैठण, शेवगाव, आळे फाटा, जुन्नर मार्गे 28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहोचणार आहे. त्यानंतर 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आंदोलन सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईत येत्या काही दिवसांत तणावाचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सरकारकडून प्रयत्न सुरू असले तरी जरांगे पाटील यांच्या निर्धारामुळे मराठा आंदोलनाची ही नवी लाट अधिक व्यापक होणार हे स्पष्ट होत आहे.