व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Maratha movement : मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा !

Maratha movement : मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा !

Green signal from police with 40 conditions : पोलिसांकडून 40 अटींसह हिरवा कंदील

Jalana : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मोठ्या मोर्चासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हा मोर्चा जुन्नर, राजगुरूनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूरमार्गे 28 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात दाखल होणार होता.

मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास बंदी घालणारा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. तरीदेखील मनोज जरांगे यांनी आपला मोर्चा मुंबईत पोहोचवण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे.

Maratha movement : फडणवीसांनी अखेर चर्चेचं दार उघडलं !

मुंबईकडे निघालेल्या या मोर्चाला जालना पोलिसांनी परवानगी दिली असली तरी तब्बल 40 अटी घालूनच हिरवा कंदील दाखवला आहे. या अटींमध्ये मोर्चादरम्यान जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा किंवा विधाने होऊ नयेत, प्रवासाचा मार्ग निश्चित केलेल्या मार्गानुसारच राहावा, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास आयोजक जबाबदार राहतील.

तसेच वाहतुकीला अडथळा येणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशा मुद्द्यांचा समावेश आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची शस्त्रे किंवा ज्वलनशील वस्तू न बाळगण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे.

Pandit Vs Hake : मी पण क्षत्रिय, घोडा लावतो म्हणणाऱ्या ‘ स्ट्रीट डॉग’ ला गप्प बसवेन

जालना पोलिसांच्या अटींनंतरही मनोज जरांगे यांचा निर्धार कायम असून त्यांनी ठामपणे मुंबई गाठण्याची घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसांत राज्याचे राजकीय वातावरण या मोर्चामुळे किती तापते आणि न्यायालयीन आदेशांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!