OBC Officers and Employees Association Convention in Shegaon : अधिकारी कर्मचारी संघाचे अधिवेशन, आरक्षण व सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी एकत्र येणार
Shegao ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने राज्य अधिवेशन व एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन येत्या १४ सप्टेंबर (रविवार) रोजी शेगाव येथील विघ्नहर्ता हॉटेल येथे करण्यात आले आहे. ही माहिती संघटनेचे महासचिव राम वाडीभष्मे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके भूषविणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून युनिटी ऑफ मुलनिवासी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी अभ्यासक कमलाकांत (कुमार) काळे, तसेच जीएसटी विभागाचे माजी असिस्टंट कमिशनर आणि एससी, एसटी, ओबीसी कर्मचारी वेल्फेअर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय थुल मार्गदर्शन करणार आहेत.
उद्घाटकीय सत्रात कुमार काळे हे “ओबीसी आरक्षण : सामाजिक लढा व आताची परिस्थीती” या विषयावर भाष्य करतील, तर संजय थुल हे “अधिकारी व कर्मचारी यांच्या समोरील आव्हाने” या विषयावर आपले विचार मांडतील. द्वितीय सत्रात नीट, जेईई व स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर सामूहिक चर्चा, ठराव व संघटनेची पुढील कार्यदिशा निश्चित केली जाईल.
संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांनी स्वागताध्यक्ष पद भूषवून समाजातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
Tension in Nepal : नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी; रस्त्यावर उतरले तरुण !
मंडल आयोग अहवालाची अंमलबजावणी तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी ७ ऑगस्ट १९९० रोजी जाहीर केली होती, तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली होती. हाच ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन यावर्षीचे अधिवेशन शेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.