Mayoral election : नॉमिनेशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस, महापौर निवड प्रक्रियेला वेग

Confusion in Ulhasnagar, curiosity due to factionalism in Kalyan Dombivli : उल्हासनगरमध्ये संभ्रम, तर कल्याण-डोंबिवलीत गटबाजीमुळे उत्सुकता

Mumbai: महापौर निवडीसाठी नामनिर्देशन पत्र nominations दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही महापालिकांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. संख्याबळ, युती-आघाडीची गणिते आणि अंतर्गत नाराजीनाट्य यामुळे दोन्ही ठिकाणी महापौरपदाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

उल्हासनगर महापालिकेत महापौर पद नागरिकांच्या मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव आहे. एकूण २० प्रभागांतील ७८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी हे प्रमुख राजकीय घटक समोर आले. भाजपला सर्वाधिक ३७ जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जमवण्यात भाजप अपयशी ठरला. काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर भाजप सत्तेबाहेर राहिला.

Dilipkumar Sananda : ‘सेफ’ राहण्यासाठी गेलेले सानंदा आता असुरक्षित?

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने वंचित बहुजन आघाडी, साई पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत एकूण ४० नगरसेवकांचे संख्याबळ उभे केले आहे. शिंदे गटाकडे स्पष्ट बहुमत असतानाही महापौर पद आपल्या मित्रपक्ष असलेल्या टीम ओमी कलानी गटाला देण्याची चर्चा शहरभर रंगली आहे. टीम ओमी कलानी गटाकडे १४ नगरसेवक असून एका अपक्षाच्या पाठिंब्यामुळे त्यांची संख्या १५ झाली आहे. या संभाव्य सत्तावाटपामुळे शिवसेना शिंदे गटातील काही इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Namo Kisan Scheme : नमो शेतकरी’च्या हप्त्याची प्रतीक्षा कायम!

महापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटातून राजेश चानपूर आणि राजेंद्र चौधरी यांची नावे चर्चेत असून टीम ओमी कलानी गटाकडून अश्विनी निकम आणि डिंपल ठाकूर यांची नावे आघाडीवर आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महापौरपद नेमके कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे उल्हासनगरकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही आजचा दिवस तितकाच निर्णायक ठरतो आहे. येथे महापौर पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची महापालिकेत युती असून त्याला मनसेचा पाठिंबा आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला नगरसेवकांच्या संख्येमुळे शिवसेना शिंदे गटातच महापौरपदासाठी स्पर्धा रंगली आहे.

शिंदे गटातील दोन नगरसेवकांमध्ये मतभेद उफाळून आले असून एका गटाकडून किरण भांगले यांना महापौर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर दुसऱ्या गटाकडून हर्षाली थविल यांना पुढे करण्यासाठी हालचाली वेगात आहेत. मनसेकडील अनुसूचित जमातीतील महिला नगरसेविकेमुळे समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. आज नामनिर्देशन पत्र कोण दाखल करणार, की महापौर निवडणूक बिनविरोध होणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दोन्ही महापालिकांमध्ये आजचा दिवस राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, संख्याबळापेक्षा राजकीय समजूतदारपणा आणि नेतृत्वाचा निर्णयच महापौरपदाचे भवितव्य ठरवेल, असे चित्र सध्या दिसून येत आहे.