Meeting of MPs : महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक

PM Modi emphasizes participation in parliamentary affairs : संसदीय कामकाजातील सहभागावर पंतप्रधान मोदींचा भर

Delhi : संसदेतील कामकाजात सक्रिय सहभाग, सरकारची प्रतिमा आणि फ्लोअर मॅनेजमेंट या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विशेष बैठक पार पडली. सकाळी प्रथम केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या दालनात सर्व खासदारांची बैठक झाली आणि त्यानंतर सुमारे १० वाजून २५ मिनिटांनी हे सर्व खासदार पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. पंतप्रधान मोदींनी संसदीय कामातील सहभाग आणि पक्षाच्या सध्याच्या राजकीय स्थितीबाबत प्रत्येक खासदाराची मते जाणून घेतल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे काल लोकसभेत गणपूर्ती न झाल्यामुळे बेल वाजवावी लागली होती, कोरम पूर्ण न होणे हे सत्ताधारी पक्षासाठी अपयश मानले जाते. सभागृहात किमान ५० खासदार उपस्थित असणे आवश्यक असताना सत्ताधारी पक्षातील खासदारांची उपस्थिती अत्यल्प होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी फ्लोअर मॅनेजमेंट सुधारण्याची तातडीची गरज व्यक्त केली असून वरिष्ठ मंत्र्यांकडे नाराजी देखील व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे. संसदीय कामकाजात निष्क्रियता आणि हलगर्जीपणाला गांभीर्याने घेत पंतप्रधानांनी खासदारांना उपस्थिती आणि सहभाग वाढवण्याचे निर्देश दिल्याचे समजते.

Pawar family : पवार कुटुंबात कौटुंबिक कार्यक्रमातही भाऊबंदकी?

बैठकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व भाजप खासदार उपस्थित होते. राज्यसभेतून धनंजय महाडीक, अनिल बोंडे, भागवत कराड, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, धैर्यशील पाटील आणि उज्ज्वल निकम उपस्थित होते, तर लोकसभेतून नितीन गडकरी, नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, हेमंत सावरा, अनुप धोत्रे, स्मिता वाघ आणि पियुष गोयल यांचा समावेश होता. पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेदरम्यान सरकारची प्रतिमा, मतदारसंघातील कामे, संसदीय सहभाग आणि आगामी राजकीय घडामोडींवरील चर्चा पार पडल्याचे सांगितले जाते.

Local body election : जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच महानगरपालिका निवडणुका?

भविष्यात अशाच प्रकारे इतर राज्यांतील भाजप खासदारांसोबत संवाद आणि समीक्षा बैठका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संसद सत्रात पक्षाच्या धोरणांना बळकटी मिळावी आणि सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली जावी यासाठी पंतप्रधानांनी खासदारांना अधिक सजग, तत्पर आणि सक्रिय राहण्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

____