political war between siddharth kharat and sanjay raimulkar : मेहकरात राजकीय संघर्ष तीव्र : विकास मुद्दे बाजूला, आरोप-प्रत्यारोपांना उधाण
Mehkar शहरातील राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोप, अफवा आणि परस्पर टीकाटिप्पणी यांच्या भोवऱ्यात अडकले असून, विकासाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित होत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या वादामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी आमदार संजय रायमूलकर आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, तो आता वैयक्तिक टीका आणि एकेरी भाषेपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. लोकप्रतिनिधींनी संयम आणि सभ्य भाषेचा अवलंब करणे अपेक्षित असताना, दोन्ही बाजूंनी पातळी घसरल्याचे चित्र नागरिकांसमोर येत आहे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य, शिवसेनेची कारवाईची मागणी
दरम्यान, शहरात गॅस टंचाई, इंधनासाठी लागणाऱ्या रांगा आणि इतर मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. या महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी राजकीय वादाला अधिक महत्त्व दिले जात असल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढत आहेत.
Banner controversy : बॅनर वादाने राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ; रोहित पवारांचा तीव्र निशाणा !
आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्येही तणाव वाढून काही ठिकाणी वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे राजकारणातील सौजन्य आणि लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या चर्चांवर दोन्ही नेत्यांची भूमिका स्पष्ट नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेऊन कारवाई करण्याऐवजी शांतता राखली जात असल्याची टीका होत आहे.या सर्व घडामोडींमुळे मेहकरचे राजकारण अधिकच ढवळून निघाले असून, सुसंस्कृत आणि विकासाभिमुख राजकारणाची गरज अधोरेखित होत आहे. नागरिकांनीही आता वादापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.








