Questions-being-raised-over-appointments-to-government-committees : मेहकर-लोणारमध्ये नियुक्त्यांवरून उपस्थित होताहेत प्रश्न
Mehkar मेहकर-लोणार मतदारसंघात शासकीय समित्यांच्या ताज्या नियुक्त्यांनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘आपलेच लोकं’ या मुद्द्यावरून चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते व पाणंद रस्ते योजनेच्या विधानसभा क्षेत्र समितीवरील नियुक्त्यांमुळे स्थानिक पातळीवर सवाल उपस्थित होत आहेत.
मेहकरच्या आमदारांच्या निकटवर्तीयांना समितीवर स्थान मिळाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. त्यामुळे गुणवत्ता, अनुभव आणि कार्यक्षमता यांना खरोखर प्राधान्य दिले जाते की ‘जवळीक’ हेच मुख्य पात्रता प्रमाणपत्र ठरते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. “सत्ता कोणाचीही असो; समित्यांवर आपलेच लोक” हा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Bjp core committee : राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजप कोअर कमिटीची निर्णायक बैठक
राजकीय निरीक्षकांच्या मते, अर्ज प्रक्रियेत कागदोपत्री निकष असले तरी प्रत्यक्षात ‘ओळखपत्रा’पेक्षा ‘ओळख’ अधिक प्रभावी ठरते, अशी धारणा जनमानसात बळावत आहे. उद्या समितीवर कोण आहे, यापेक्षा ‘कोणाचा माणूस आहे?’ हा प्रश्न अधिक चर्चेत येत आहे, हीच खरी चिंता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Bjp maharashtra : भाजपची महाराष्ट्रातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
हा मुद्दा एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेच्या पारदर्शकतेशी संबंधित आहे. स्थानिक पातळीवर विकासकामांशी निगडित समित्यांमध्ये खऱ्या अर्थाने पात्र आणि तज्ज्ञ व्यक्तींना संधी मिळते का, यावरच प्रशासनावरील विश्वास अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. आता या नियुक्त्यांबाबत अधिकृत स्पष्टीकरण येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








