Mid-day meal : शालेय पोषण आहार कामगारांचे ७ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

Statewide protest by workers on December 7 : मानधनवाढीची घोषणा अधांतरी; तालुकास्तरावर धरणे

Buldhana मालेगाव येथे शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनानंतर राज्यभरातील शालेय पोषण आहार कामगारांनी आता ७ डिसेंबर रोजी प्रत्येक तालुकास्तरावर पंचायत समिती व तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. सीटूच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, सरकारने दिलेल्या मानधनवाढीच्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्याच्या सत्ताधारी पक्षांच्या मंत्रिमंडळाने स्वयंपाकी-मदतनिसांच्या मानधनात १,००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सत्तेवर आल्यानंतर ही वाढ लागू न झाल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. सीटूच्या नेतृत्वात या मुद्द्यावर वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला.

Local Body Elections : ३५ टक्के ‘लाडक्या बहिणी’ घराबाहेर पडल्याच नाहीत

मालेगाव येथील आंदोलनानंतर मंत्रालयात शिक्षण मंत्री दादा भुसे आणि सीटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारने पुन्हा एकदा १,००० रुपयांची मानधनवाढ मान्य केल्याचे जाहीर झाले. तरीसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने संघटना आक्रमक झाली आहे. हिवाळी अधिवेशनात ही वाढ तातडीने मंजूर करावी, अशी कामगारांची मागणी आहे.

राज्यभरात ५ डिसेंबर रोजी तसेच बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये ७ डिसेंबरला मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात चिखली, मेहकर, संग्रामपूर, लोणार यांसह सर्व तालुक्यांमध्ये धरणे आंदोलन नियोजित आहे.

Local Body Elections : चिखलदऱ्याच्या निवडणुकीत अकोल्याहून ‘रसद’ पुरवणारा बिल्डर चर्चेत

संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, सचिव समाधान राठोड, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, तसेच शोभाताई काळे, उषा डुकरे, ज्योती आराख, संभाजी डंगवार, अनंता धर्माळ, रेखा गवई, अनिल राठोड, रेखा जाधव, राजू गिरी, गजानन शेळके, गोपाल शिंगणे आदींनी सर्व पोषण आहार कामगारांना संबंधित तालुक्यातील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.