व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Minimum Support Price (MSP) scheme : आधारभूत किंमत योजनेत मका विकला, तीन...

Minimum Support Price (MSP) scheme : आधारभूत किंमत योजनेत मका विकला, तीन महिन्यांपासून पैशांचा पत्ता नाही

₹22 crore of thousands of farmers from four talukas stuck with the government : चार तालुक्यातील तीन ते चार हजार शेतकऱ्यांचे २२ कोटी शासनाकडे अडकले

Motala राज्य शासनाने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या मक्याचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट तब्बल तीन महिन्यांपासून प्रलंबित असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मोताळा, मलकापूर, नांदुरा आणि बुलढाणा या चार तालुक्यांतील सुमारे ३ ते ४ हजार शेतकऱ्यांचे जवळपास २० ते २२ कोटी रुपये शासनाकडे अडकले आहेत.

राज्य शासनाने २४०० रुपये प्रति क्विंटल या आधारभूत दराने जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांकडून खरेदी केली. या अंतर्गत मोताळा तालुक्यात २७ हजार क्विंटल, बुलढाण्यात २० हजार, मलकापूरमध्ये २० हजार आणि नांदुरात ७ हजार क्विंटल, असा मिळून सुमारे ८५ ते ९० हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आला. या सर्व खरेदीचे एकत्रित मूल्य २० ते २२ कोटी रुपयांच्या घरात जात असताना अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली नाही.

Prakash Ambedkar : वंचितच्या नेत्यांनी सोडली आंबेडकरांची साथ, शिवसेनेत प्रवेश

बाजारात मक्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या खरेदी केंद्रांवर विश्वास ठेवत हालअपेष्टा सहन करून मका विक्रीसाठी आणला. वाहतूक, प्रतीक्षा, कागदपत्रे आणि दर्जा तपासणीच्या प्रक्रियेत अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी मका शासनाला दिला; मात्र जानेवारीपासून खरेदी झालेल्या मक्याचा एक रुपयाही अद्याप मिळाला नसल्याचे चित्र आहे.

पेमेंट रखडल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक ताण निर्माण झाला आहे. बँकांचे कर्ज, बियाणे-खतांची देणी, घरगुती खर्च, लग्नकार्य आणि दवाखान्याचे खर्च भागवण्यासाठी अनेकांना खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घ्यावे लागत असल्याची परिस्थिती आहे.

error: Content is protected !!