Minister Aditi Tatkare accused of arbitrary functioning : बाल संगोपन योजना राबविताना बाहेरील जिल्ह्यांना प्राधान्य?

Allegation of discrimination in the implementation of the child care scheme : मंत्री अदिती तटकरेंवर मनमानी कारभाराचा आरोप; निवृत्ती जाधव यांची पत्रकार परिषदेत टीका

Buldhana राज्याच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजनेच्या अंमलबजावणीत मंत्री ना. अदिती तटकरे आणि त्यांच्या स्वीय सहायकाकडून मनमानी कारभार होत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.

स्थानिक पत्रकार भवन येथे मंगळवार, ९ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यातील पात्र, अनुभवी आणि सेवाभावी संस्थांना डावलून बाहेरील जिल्ह्यातील संस्थांना जिल्ह्यात कामकाजाची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक संस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Local Body Elections : कोण निवडून येणार? सोशल मीडियावरच रंगतेय आकडेमोड

० ते १८ वयोगटातील एकल पालकांची मुले, अपंग मुले तसेच अनाथ मुलांसाठी ही योजना राबविली जाते. संबंधित संस्थांकडून सर्वेक्षण करून प्रस्ताव बालकल्याण समितीकडे सादर करण्याची प्रक्रिया ठरलेली आहे. मात्र, ही प्रक्रिया न पाळता थेट बीड, अहिल्यानगर, परभणी आणि वाशिम येथील संस्थांना बुलढाणा जिल्ह्यासाठी मान्यता देण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.

स्थानिक संस्थांपैकी —

संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था (केळवद)

स्व. निबाजी पाटील संस्था (डोणगाव)

सरस्वती प्रकाश संस्था (सावरगाव मुंडे)

मंगलमूर्ती बहुउद्देशीय संस्था (लोणार)

— या किमान पाच पात्र संस्थांना दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला.

एजंटांमार्फत लाभार्थी महिलांची फसवणूक होत असून एका दलालामार्फत संपूर्ण व्यवहार चालत असल्याचा आरोप संबंधित संस्थांनी केला असल्याचेही जाधव म्हणाले. “आम्ही पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आमच्या संस्थांना मान्यता नाकारण्यात आली,” असा दावाही त्यांनी केला.

Dr. Shashikant Khedekar : रब्बी हंगामावर संकट, सिंचनासाठी तातडीने पाणी सोडा

बाहेरील जिल्ह्यांना दिलेल्या मान्यता तात्काळ रद्द कराव्यात, महिला व बालविकास विभागाचे संबंधित पत्र मागे घ्यावे, अन्यथा १६ डिसेंबर रोजी मुंबई मंत्रालयासमोर ‘ममता विदर्भ एनजीओ फेडरेशन’च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवृत्ती जाधव यांनी दिला.