Ministers foreign visit : महाराष्ट्र भुकेला असताना मंत्री परदेशात !

Farmer suicides, scheme closed, Sanjay Rauts criticism : शेतकरी आत्महत्या, योजना बंद, संजय राऊतांची टीका

New Delhi : महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट असताना राज्यातील अनेक मंत्री परदेश दौऱ्यावर गेले असल्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. कार्यक्रम खासगी असो वा सरकारी, महाराष्ट्र भुकेला – कंगाल असताना मंत्री परदेशात फिरत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत, योजना बंद पडल्या आहेत. अशा वेळी मंत्री राज्य वाऱ्यावर सोडून लंडनला गेले, ही चिंतेची बाब आहे, असे राऊत म्हणाले.

राऊतांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधींना आठ दिवसांत शपथपत्र द्या किंवा माफी मागा, असं सांगणं हा अ‍ॅरोगन्स आहे. भाजपाच्या हस्तकांसारखं वर्तन निवडणूक आयुक्तांकडून होत आहे. राहुल गांधींकडून शपथपत्र मागण्याची हिंमत दाखवली, पण भाजपाचे मंत्री अनुराग ठाकूर यांनीही तसाच आरोप केला. मग त्यांच्याकडे अ‍ॅफिडेव्हिट मागायची हिंमत आहे का? वायनाडमध्ये मतदार याद्यांमध्ये गडबड झाली आहे, याची कबुली केंद्रीय मंत्र्यांनी दिली. तरी त्यांच्यावर कारवाई नाही, अशी टीका राऊतांनी केली.

Protest for loan waiver : दारूबंदीसाठी मोटारसायकल रॅली; तहसीलदारांना निवेदन

इंडिया आघाडी उपराष्ट्रपती निवडणूक लढवणार की नाही, याबाबत निर्णय बैठकीत होईल, असं राऊत म्हणाले. देशात उपराष्ट्रपती निवडणुकीपेक्षा मतचोरीचा मुद्दा गंभीर आहे. आमच्याकडे बहुमत नसल्यामुळे निवडणुकीत लक्ष घालण्यापेक्षा लोकशाहीसाठी गंभीर प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Sanjay shirsat : संजय शिरसाटांकडून 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार !

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी घोषणा झाल्यावर राऊत म्हणाले, ते संतुलित आणि अनुभवी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी महाराष्ट्रात न्यायाने काम केलं. तामिळनाडूत भाजप वाढवण्यासाठी मेहनत घेतली. संघाशी त्यांचं नातं आहे. पार्टीबाहेरील नव्हे तर केडरमधील कार्यकर्त्याला संधी मिळणं चांगलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती होत असतील, तर आम्हाला आनंदच आहे. असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.