Ministers U turn : क्रीडा खातं बरं होतं; आता त्रास घ्यावाच लागेल

Agriculture Minister Dattatreya Bharanes statement and immediate U-turn : कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य आणि लगेच यू-टर्न

Indapur : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे निरा नदीकाठावरील पूर संरक्षण भिंतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं क्रीडा व अल्पसंख्यांक खात बरं होतं, त्रास नव्हता; पण आता कृषी मंत्रालयात त्रास घ्यावाच लागेल.
भरणे यांच्या या विधानानंतर लगेचच त्यांनी सारवासारव करत सांगितलं की, हा त्रास नाही, ही जबाबदारी आहे. नेत्यांनी ठेवलेल्या विश्वासाचं ओझं आहे. भरणे यांच्या विधानानंतर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांना खरंच कृषी खात्याचा भार झेपतोय का? पूर्वीचं क्रीडा आणि अल्पसंख्यांक खाते सोपं होतं असं सूचित करायचं होतं का? त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Shahaji Patil Vs Raut : हा भविष्य सांगणारा पोपट ! याच्या सगळ्या चिठ्ठ्या खोट्या !

धाराशिव येथे शेती नुकसान पाहणीदरम्यान भरणे यांनी आणखी एक महत्वाचं विधान केलं. ते म्हणाले मी शेतकरी पुत्र आहे. सकाळी उठलो तरी शेती दिसते, रात्री झोपलो तरी शेती दिसते. शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या माहित आहेत. शेतकरी कर्जमाफी 100% झाली पाहिजे. कर्जमाफीबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्यवेळी घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अलीकडेच कृषी मंत्रालय वादात सापडलं होतं आणि नवीन मंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती झाली. पदभार स्वीकारल्यानंतर केवळ दोन आठवड्यांत त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

______