Amol Mitkaris counterattack on Radhakrishna Vikhe Patil : अमोल मिटकरींचा राधाकृष्ण विखे पाटलांना पलटवार
Mumbai : महायुतीच्या राजकारणात नेत्यांमधील आरोप – प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विखे पाटलांना थेट पलटवार करत टोलेबाजी केली.
अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावरून विखे पाटलांना उद्देशून लिहिलं “भाजपचे वरिष्ठ नेते आपली दखल घेतीलच, पण उगाच खेटे घेऊ नका #राधेकृष्ण. विखे पाटील विसरले असावेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. अजितदादांवर टीका करताना जरा जपून! अपेक्षा आहे भाजपश्रेष्ठी याची दखल घेतील.” त्यासोबतच त्यांनी आणखी एक टोला लगावत म्हटलं “बाकी विखे पाटीलजी, आपल्या कार्यकर्तृत्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगली आहे बरं का! उगाच खेटे घेऊ नका राधेकृष्ण.”
Protest in university : शिक्षणाच्या मंदिरांना राजकारणापासून दूर ठेवण्याची मागणी
धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी साखर धोरण आणि इथेनॉल प्रकल्पाच्या संदर्भात अजित पवारांवर टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं “अजित पवार, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी इथेनॉल धोरण लागू करून कारखान्याला जीवदान दिलं, तर त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर तरी कारखान्याच्या सभेत लावा.”
याआधीही त्यांनी शरद पवारांवर भाष्य करताना निवडणूक प्रक्रियेवर केलेल्या वक्तव्यांवर सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील मतभेद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
_____