We do not count Laxman Hake as an OBC leader : आमदार मिटकरी यांचा घणाघात; हाकेंना ओबीसी नेता मानत नाही
Akola “लक्ष्मण हाके यांची औकात अजित पवारांवर टीका करण्याइतकी नाही. आमच्यावर हल्ला चढवण्यासाठी त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागेल,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हाकेंवर जोरदार टीका केली आहे.
हाके हे ओबीसी नेते असल्याचा दावा फेटाळून लावताना मिटकरी म्हणाले, “गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, हरीभाऊ राठोड हे ओबीसीचे खरे नेते. लक्ष्मण हाके यांना आम्ही त्या यादीत मोजत नाही.”
मिटकरी पुढे म्हणाले, “हाकेंनी जागा आणि वेळ सांगावी, मी येण्यासाठी तयार आहे. स्वतःला मर्द समजत असतील, तर त्यांनी माझ्या शर्टच्या बटनाला हात लावून दाखवावा.” यावेळी त्यांनी अत्यंत तीव्र शब्दांत हाकेंच्या वक्तव्यावर टीका करताना काही आक्षेपार्ह वक्यांचीही उधळण केली. “लक्ष्मण हाके रात्री कोणत्या अवस्थेत होते हे सांगण्याची गरज नाही,” असेही ते म्हणाले.
“अजित पवारांनी ओबीसी, व्हीजेएनटी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, असा आरोप हाके करत आहेत. मात्र त्यांनी अर्थसंकल्प वाचलेलाच नाही, असे स्पष्ट होते. आम्ही हवेत आरोप करत नाही. अधिवेशन ३० जूनपासून सुरू होत आहे,” असेही मिटकरी यांनी सांगितले.
मिटकरी म्हणाले, “आमच्या पक्षात सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदिती तटकरे हे सर्व ओबीसी नेतृत्वातले आहेत. आदिवासी समाजासाठी झिरवाळ साहेब काम करत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असेल, तर हेच लोक आवाज उठवतील.”
“लक्ष्मण हाके ओबीसी नेते कधी झाले? हा माझा साधा प्रश्न होता. पण त्याऐवजी त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याचा मार्ग निवडला,” असा आरोपही मिटकरी यांनी केला. त्यांनी आणखी एक उदाहरण देताना सांगितले की, “विदर्भात रवीकांत तुपकर यांना शेतकऱ्यांनी आंदोलनातल्या भूमिकेसाठी गाडी घेऊन दिली. पण लक्ष्मण हाकेंना कोणत्या कारणाने गाडी दिली गेली, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.”
Nagpur Municipal Corporation : तर एका मुसळधार पावसात वाहून जातील हजारो नागपूरकर
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी नुकतीच अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. “२० वर्षांपासून ते अर्थमंत्री असूनही त्यांनी ओबीसी समाजासाठी वस्तीगृहे, शिष्यवृत्ती, महाज्योतीसारख्या योजनांसाठी निधीची तुटवडा ठेवला आहे,” असा आरोप हाकेंनी केला. “आम्ही निधी मागितला तर वैयक्तिक हल्ले होतात,” अशीही तक्रार त्यांनी मांडली.