Breaking

MLA Gopichand Padalkar : पडळकरांवर गुन्हा दाखल करा, वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

Christian community demands filing of case against MLA : ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Akola सांगलीत १५ जून रोजी पार पडलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना मारहाण करण्याचे व जिवे मारण्याचे खुले आवाहन करत ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे.

या बेताल व द्वेषमूलक विधानाचा अकोला जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाने तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. ख्रिस्ती समाजाच्या भावनांशी खेळ करत, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आमदार पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची तसेच त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Public Safety Act : जनसुरक्षा कायदा विरोधकांवर कारवाई करण्यासाठीच !

“संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अवमान”
ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय असून, भारतीय संविधानाने बहाल केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. मात्र, आ. पडळकर यांच्या धर्मविरोधी वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंना आणि प्रार्थनास्थळांना धोका निर्माण झाल्याचे ख्रिस्ती शिष्टमंडळाने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून, कलम १४, १५, २५ आणि २६ नुसार सर्व नागरिकांना समानतेसह धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे. आ. पडळकर यांचे विधान या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे असून, ते समाजात तेढ व हिंसेला चिथावणी देणारे आहे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

Adulteration in milk : दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक शिक्षा करण्याची मागणी

शिष्टमंडळाची उपस्थिती
या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. प्रमोद इंगळे, रे. राहुल हिवरे, रे. देवदत्त गायकवाड, पास्टर दिलीप सरदार, ब्रदर देवानंद साळवे, अ‍ॅड. नहशोन बिरपाल, प्राचार्य अर्पणा डोंगरे, पास्टर विनोद हातोले, ब्रदर स्वरूप घाडगे, ब्रदर अशोक जामनिक, प्रिन्सिपल अनुुल मनवर आदींसह शेकडो ख्रिस्ती नागरिक उपस्थित होते.