Breaking

MLA Nitin Deshmukh : श्रेय लाटण्याचा काही लोकप्रतिनिधींचा डाव

A ploy by some people’s representatives to steal credit : आमदार नितीन देशमुख विकासकामांवरून संतापले

Akola पातूर नगर परिषद हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांवरून काही लोकप्रतिनिधींनी श्रेय लाटण्याचा डाव आखला आहे. असा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत केला. नगर परिषदेकडील हक्काचा निधी वापरून सुरू असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन केले. आणि हा निधी स्वतः आणल्याचा खोटा दावा काही लोकप्रतिनिधी करत आहेत. शासनाकडून कोणताही विशेष निधी पातूर शहरासाठी आणला नाही. तरीही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी आमदार देशमुख यांनी सांगितले की, नगर परिषदेचा हक्काचा निधी योग्य ठिकाणी व पारदर्शकतेने खर्च व्हावा. यासाठी आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जाईल. आमदार नितीन देशमुख यांनी हा आरोप का केला? कुणावर त्यांनी निशाना साधला? याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

MVA facing internal politics : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

आमदार देशमुख यांनी शहरातील आठ-दहा दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. तसेच दर दोन दिवसांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. शहरात सुरू असलेल्या घरकुल २.० योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलाचा लाभ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर कंत्राट आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत अनियमितता आहे. हे देखील देशमुख यांनी निदर्शनास आणले. २०१८ च्या डीपीआरनुसार मंजूर कंत्राटानंतरही कंत्राटाचा खर्च वाढवण्यात आले. मात्र कामे कमी प्रमाणात करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या सहा महिन्यांतील कामाचा आढावा घेऊन कंत्राटदाराला कमी अनुदान देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

MLA Siddharth Kharat : काम करायची इच्छा नसेल तर तुमचा मार्ग मोकळा

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामांसाठी कोणताही कृती आराखडा तयार न करता मनमानी सुरू आहे. असा आरोप देशमुख यांनी केला. त्यांनी यासंदर्भात राज्य शासनाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला. शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि अन्य नागरी सुविधांवरील तक्रारींवर आ. देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांच्या गरजेनुसार कामे मार्गी लावण्यासाठी दोन-तीन दिवसांचा अल्टिमेटम त्यांनी दिला.

पातूर शहराच्या विकासासाठी पारदर्शक व प्रभावी कामे करण्यावर आमदार देशमुख यांनी भर दिला. शासन निधीचा योग्य वापर करून जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचे ते उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.