Breaking

MLA Nitin Deshmukh : आमदार देशमुखांचे ठिय्या आंदोलन, अधिकारी निलंबित

Officer suspended after MLA’s protest : जीवन प्राधीकरणाच्या कार्यालयात ठाण मांडल्यानंतर प्रशासन जागे

Akola जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांनी कंत्राटी महिला कर्मचाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी केली होती. यावर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी जीवन प्राधिकरणात ठाण मांडल्यानंतर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. या ठिय्या आंदोलनाने प्राधिकरण व एकूणच प्रशासनाला अक्षरशः घाम फोडला होता.

मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी महिला कॉम्प्युटर ऑपरेटरकडून दोन अधिकाऱ्यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अधिकाऱ्यांची नावे उपविभागीय अधिकारी डी. बी. कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे अशी आहेत.

Dr. Rajendra Shingne : जातीपातीचं राजकारण सोडा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या!

या दोन्ही अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी विधानसभेत या विषयाकडे अध्यक्षांनी लक्ष दिले नाही, असा आरोप केला. या प्रकरणी लक्षवेधी प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आला होता. मात्र अध्यक्षांनी मुद्दाम लक्ष दिले नाही. अध्यक्ष मॅनेज झाले असावेत, असा आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे.

Harshvardhan Sapkal : काँग्रेस करणार जनसुरक्षा कायद्याची होळी!

‘अध्यक्षांनी मुद्दाम लक्षवेधी न घेतल्याने मी अधिवेशनात अनुपस्थित राहून आज एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यात ठिय्या आंदोलन करत आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पीडित महिला कॉम्प्युटर ऑपरेटरने म्हटले आहे की, आरोपी कपिले यांना मूर्तिजापूर मतदारसंघातील आमदारांचे पाठबळ असल्यामुळे वारंवार तक्रार करूनही आपल्याला न्याय मिळालेला नाही.’ पैसा आणि राजकीय पाठबळाच्या आधारावर आरोपींना वाचवले जात आहे, असा आरोपही तिने केला आहे.