Bhausaheb Fundkar’s thoughts should be accepted : आमदार रणधीर सावरकर यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
Akola राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषद, जनसंघ व भारतीय जनता पक्ष या संस्थांमध्ये सलग ५० वर्षे कार्य करणारे, शेतकऱ्यांसाठी खामगाव ते आमगाव दिंडी काढणारे, आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारे लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांचे विचार आणि कार्य प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने आत्मसात करावे, असे आवाहन भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप अकोला कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार सावरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत मसने होते. यावेळी खासदार अनुप धोंत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, किशोर पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, तेजराव थोरात, गिरीश जोशी, माधव मानकर, सिद्धार्थ शर्मा, डॉ. किशोर मालोकार इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Harish Sharma : जिल्हाध्यक्षपदासाठी हरीश शर्मांवर विश्वास, पुन्हा एकदा नियुक्ती
या प्रसंगी खासदार अनुप धोंत्रे म्हणाले, “भाऊसाहेब फुंडकर हे विद्यार्थी जीवनापासून संघ व परिषदेत सक्रीय राहिले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रात पक्षाचा प्रभाव वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. संघटन कार्यात दररोज १८ तास देणारे ते एक निष्ठावान लोकनेते होते.”