Breaking

MLA Sajid Khan Pathan : प्रशिक्षण नको, आता कायमस्वरुपी रोजगार द्या!

CMYKPY scheme trainees protest in Mumbai : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे आझाद मैदानावर छत्री आंदोलन

Mumbai ‘आम्हाला प्रशिक्षण नको, आता कायमस्वरूपी रोजगार द्या’ अशी हाक हजारो तरुणांनी सरकारला दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणात सहभागी झालेल्या राज्यभरातील तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर छत्री आंदोलन केले. या आंदोलनात अकोला पश्चिमचे आमदार साजीद खान पठाण देखील सहभागी झाले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये नियुक्त करण्यात आले. मात्र, बेरोजगार युवक-युवतींचा प्रशिक्षण कालावधी आता संपत आला आहे. या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये पुढील भवितव्याबाबत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच हे आंदोलन करण्यात आले.

MLA Nitin Deshmukh : आमदार देशमुखांचे ठिय्या आंदोलन, अधिकारी निलंबित

अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व संवाद साधला. ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे त्यांच्यासोबत उभा राहील,’ असं ते म्हणाले.

‘महायुती सरकारने केवळ निवडणूकपूर्व मतांसाठी बेरोजगार युवक-युवतींचा वापर केला आहे. आता त्यांना दुर्लक्षित केले जात आहे. हे केवळ आश्वासनाचे नाटक आहे. सरकारने बेरोजगारांसोबत विश्वासघात केला आहे. या फसव्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,’ असं आवाहनही त्यांनी केलं.

Dr. Rajendra Shingne : जातीपातीचं राजकारण सोडा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या!

आंदोलनात माजी खासदार हरिभाऊ राठोड, बालाजी पाटील चाकूरकर, हभप श्री संत तुकाराम बाबा महाराज, अनुप चव्हाण, प्रकाश साबळे यांसह गुड्डू पठाण, मो. मोईन उर्फ मंटूभाई, रिजवान खान, खिजर नवाब आणि महाराष्ट्रभरातून आलेले हजारो प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.