MLA siddharth kharat : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजी, तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश

many-youngsters-join-shivsena-UBT-mla-siddharth-kharat : महागाई अन् शेतमालाला भाव मिळत नसल्याचे कारण देत निर्णय

Mehkar देशभर वाढती महागाई, शेतमालाला न मिळणारा योग्य भाव आणि सर्वसामान्य नागरिकांवर वाढलेला आर्थिक ताण या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाविरोधात जनतेत नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. अशा परिस्थितीत हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे युवकांचा कल वाढत असल्याचे चित्र मेहकर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

पक्षातील नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मौजे वडाळी (ता. मेहकर) येथील शेकडो नवयुवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष रहाटे व सर्कल प्रमुख पंडित बापू देशमुख यांच्या हस्ते नवयुवकांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये अभिषेक भुरकडे, सुरेश शिंदे, बाळू मदने, परीक्षित होनमने, गोपाल झ्याटे, आकाश जटाळे, अनित जोडनार, विशाल भोकरे, हरीश परदेशी, प्रथमेश करे, प्रवीण धंदरे, यश करे, उत्तम शेळके, आकाश शिंदे, अजित घोरपडे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.

BJP protest : काँग्रेसने संसदेची पवित्र परंपरा व प्रतिष्ठेचा अवमान केला

या प्रसंगी भागवत बोरकर, गबाजी गवई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेहकर तालुक्यातील युवकांचा वाढता पाठिंबा पाहता आगामी राजकीय समीकरणांमध्ये शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख पुरुषोत्तम बोर्डे यांनी दिली.