mehkar-politics-siddharth-kharat-vs-shindesena-credit-war-lonat-development : मेहकर-लोणारात श्रेयवादाचे राजकारण, अधिवेशन काळात निवडणुकीची तयारी?
Mehkar मेहकर विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उद्धवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात आणि शिंदेसेनेचे पदाधिकारी यांच्यात श्रेयवादाची लढाई उफाळून आली आहे. विशेष म्हणजे राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू असताना आमदार खरात यांनी मतदारसंघात वाढवलेले दौरे आणि दुसरीकडे शिंदेसेनेच्या माजी आमदारांनी मुंबईत बसून समाजमाध्यमांवर सुरू केलेला प्रचाराचा धडाका, यामुळे आगामी निवडणुकांचे बिगुल आत्ताच वाजल्याचे चित्र दिसत आहे.
आमदार सिद्धार्थ खरात सध्या मेहकर आणि लोणार परिसरातील गावोगावी भेटी देत असून रंगपंचमी, महाप्रसाद आणि स्थानिक बैठकांचा धडाका त्यांनी लावला आहे. लोणारमधील पाणीप्रश्न आणि पर्यटन विकासाच्या नावाखाली या बैठका होत असल्या तरी, राजकीय निरीक्षकांच्या मते ही केवळ विकास चर्चा नसून आगामी जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली मोर्चेबांधणी आहे. अधिवेशनाकडे पाठ फिरवून मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यामागे संघटनात्मक बांधणीचा मोठा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
Sindkhed raja development : ‘तीन शिलेदार’ विधिमंडळात; आता तरी विकासाचा वनवास संपणार का?
दुसरीकडे, शिंदेसेनेचे स्थानिक नेते आणि माजी आमदार सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. मंत्रालयातील विविध मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन मतदारसंघातील कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसतोय. विशेषतः समाजमाध्यमांवर ‘रिल्स’ आणि पोस्टच्या माध्यमातून “आम्हीच ही कामे खेचून आणली” असा दावा केला जात आहे. मुंबईतून होत असलेल्या या ‘डिजिटल’ प्रहाराला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार खरात यांनी थेट मैदानात उतरून ‘ग्राऊंड फिल्डिंग’ लावल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
Congress internal politics : निष्ठावंतांना दुय्यम स्थान, आयारामांना संधी, जुन्यांमध्ये नाराजी!
खरातांच्या या वाढत्या सक्रियतेमुळे शिंदेसेनेच्या गोटातही अस्वस्थता पसरली असून, लोणारच्या पर्यटन विकासाचा मुद्दा आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय कळीचा मुद्दा बनला आहे. एकीकडे मुंबईतून फाईली हलवून विकास केल्याचा दावा आणि दुसरीकडे मतदारसंघात प्रत्यक्ष फिरून जनसंपर्क वाढवण्याची रणनीती, अशा दोन टोकाच्या कार्यपद्धतीमुळे मेहकरच्या राजकारणात सध्या मोठी चुरस निर्माण झाली आहे. ही राजकीय पेरणी आगामी निवडणुकांमध्ये कोणाच्या पथ्यावर पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








